DA Hike: लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, DA मध्ये मोठी वाढ, आदेश जारी, ‘या’ दिवशी खात्यात रक्कम वाढणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

DA Hike : अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी महागाईच्या भत्त्याची वाट पाहत होते. आता याच कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आनंदाची बातमी देणार आहे. लवकरच कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली जाणार आहे.

दरम्यान हे लक्षात घ्या की, वर्षातून दोनवेळा महागाई भत्त्यात वाढ केली जाते. सरकारच्या या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर खूप मोठा ताण येणार आहे. तसेच फक्त केंद्रीय कर्मचारी नाही तर पेन्शनधारकांनाही याचा फायदा होणार आहे.

महागाई भत्त्यामध्ये वाढ

तेलंगणा सरकारने आपल्या राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी दिली असून महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री केसीआर यांनी घेतला आहे. आता कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि पेन्शनवर २.७३% महागाई भत्ता देण्यात येणार आहे. जानेवारी 2022 पासून वाढीव रकमेची गणना करून जूनपासून दरवाढ लागू करण्याचे अधिकृत आदेश वित्त विभागाकडून जारी करण्यात आले आहेत.

तिजोरीवर येणार अतिरिक्त बोजा

यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ९७४.१६ कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा येणार आहे. तसेच मासिक 81.18 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारकडून सोमवारी महागाई सवलत वाढविण्यासाठी ऑर्डर क्रमांक GO 50 आणि ऑर्डर क्रमांक GOA MF 51 जारी करण्यात येणार आहे.

जारी केले आदेश

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, 1 जानेवारी 2022 पासून, सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या 20.02 टक्क्यांवरून मूळ वेतनाच्या 22.75 टक्के केला आहे. तर 2015 मध्ये पगार काढणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता 55.53% वरून 59.19% केला आहे. हे 1 जानेवारी 2022 पासून लागू केले जाणार आहे.

तर दुसरीकडे, 1 जुलै 2023 रोजी जून 2023 च्या पगारासह वाढीव महागाई भत्ता देय असणार आहे. 1 जानेवारी 2022 ते 31 मे 2023 पर्यंतच्या थकबाकी भरण्याबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात येणार आहेत.

महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ

UGC/AICTE/SNJPC वेतनश्रेणी, 2016 काढणार्‍या सर्व कर्मचार्‍यांसाठी 1 जानेवारी 2022 पासून मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर सध्याच्या 31 टक्क्यांवरून 34 टक्के केला आहे. परंतु हे लक्षात घ्या की हे कर्मचारी जे विद्यापीठे, सरकारी अनुदानित आणि संलग्न पदवी महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, जे UGC वेतनश्रेणी काढत आहेत आणि पॉलिटेक्निक, AICTE वेतनश्रेणी आणि SNJPC वेतनश्रेणी काढणारे न्यायिक अधिकारी 2016 साठी पात्र आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे.

पेन्शनधारकांना होणार फायदा

सरकारी कर्मचाऱ्यांसोबत पेन्शनधारकांसाठी महागाई सवलतीतही वाढ केली आहे.