आर्थिक

DA Hike Breaking : सप्टेंबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आनंदाची बातमी

Published by
Ajay Patil

DA Hike:- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातील वाढ हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असून यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे. देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडून केंद्रामध्ये दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले व या सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्तामध्ये वाढ केली जाईल अशी एक अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना याबाबत प्रतीक्षा असून साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना याबाबत आनंदाची बातमी मिळू शकते अशी एक शक्यता आहे

महागाई भत्ता वाढीसोबतच कोरोना कालावधीमध्ये कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता सरकारने थांबवलेला होता व ती जवळपास 18 महिन्यांची थकबाकी मिळावी

याबाबत देखील कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे. परंतु महागाई भत्त्याच्या थकबाकी बाबत केंद्र सरकारच्या माध्यमातून अजून पर्यंत मात्र कोणत्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाही. परंतु महागाई भत्त्यामध्ये वाढ होऊ शकते अशी एक शक्यता आहे.

 महागाई भत्त्यात होऊ शकते तीन टक्क्यांची वाढ

सप्टेंबर महिन्यामध्ये सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक आनंदाची बातमी देण्याची शक्यता असून नव्याने स्थापन झालेले केंद्रातील सरकार पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करेल अशी एक अपेक्षा आहे.

जर सरकारने यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली तर महागाई भत्ता हा 53% होईल. केंद्र सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात केल्या जाणाऱ्या वाढीच्या दृष्टिकोनातून बघितले तर दरवर्षी ही वाढ दोनदा करण्यात येते. त्यामध्ये जानेवारी आणि दुसरी वाढ जुलै महिन्यामध्ये होत असते.

केंद्रामध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र महागाई भत्ता वाढीबाबत सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही व या घोषणेची कर्मचारी आता वाट पाहत आहेत.या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकार सप्टेंबर महिन्यामध्ये याबाबत चांगली बातमी देणार आहे.

आता जी महागाई भत्तातील वाढ केली जाणार आहे ती सातव्या वेतन आयोग अंतर्गत होणार आहे. जानेवारी 2024 मध्ये सरकारच्या माध्यमातून महागाई भत्त्यात  चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली होती व त्यानंतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे.

अशा परिस्थितीमध्ये जुलै महिन्यासाठी तीन किंवा चार टक्क्यांची वाढ आता अपेक्षित आहे. एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि पगार वाढल्यानंतर आणखी इतर भत्त्यांमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे व त्यामुळे कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल.

समजा एखाद्या कर्मचाऱ्याला जर पन्नास हजार रुपये महिन्याला पगार असेल तर महागाई भत्ता तीन किंवा चार टक्क्यांची वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन हजार रुपयांची वाढ होईल.

Ajay Patil