DA Hike:- सध्या सणासुदीचे दिवस असून या दिवसांमध्ये अनेक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारचे आर्थिक फायदे दिले जातात. अगदी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर महागाई भत्ता वाढीबाबत गेल्या कित्येक दिवसापासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना प्रतीक्षा होती.
या विषयीच्या अनेक बातम्या प्रसारमाध्यमातून देखील येत होत्या. परंतु सरकारला काही महागाई भत्तावाढीच्या घोषणे संदर्भात मुहूर्त सापडत नव्हता. परंतु एकदाचा केंद्र सरकारला मुहूर्त सापडला व या सणासुदीच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आली.
या कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता. यामध्ये आता चार टक्क्यांची वाढ झाल्याने महागाई भत्ता हा 46 टक्के होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देखील देण्यात आली.
महागाई भत्त्यात करण्यात आलेली ही वाढ एक जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांकरिता लागू होणार आहे. अगदी याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्र राज्य सरकारने देखील सणासुदीच्या कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांसाठी खास दिवाळी भेट दिलेली आहे व त्यासंबंधीचेच माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
एसटी महामंडळाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून दिवाळी भेट
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून यावर्षी एसटी महामंडळाच्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना दिवाळीनिमित्ताने भेट देण्यात आली असून दिवाळी पूर्वीच महिन्याचा पगार केला जाणार असून त्यामध्ये पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे व सण अग्रीम रक्कम म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.
त्यामुळे नक्कीच या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे. मागच्या वर्षी देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपये सरसकट सानुग्रह अनुदान दिले होते. अगदी त्याचप्रमाणे यावर्षी देखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे.
एवढेच नाही तर राज्य परिवहन महामंडळातील तृतीय आणि चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांना ज्यांचे वेतन 43 हजार 477 अथवा त्यापेक्षा कमी आहे अशा कर्मचाऱ्यांना सण अग्रीम म्हणून 12500 देण्यात येणार असल्याचा देखील निर्णय घेतला आहे.