अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- बरेच लोक शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास घाबरतात. त्यात होणारे चढ-उतार लक्षात घेता त्यांची चिंता योग्य असू शकते. पण नफ्याच्या बाबतीत अशा लोकांचे नुकसान होते.
स्टॉक मार्केट हे एकमेव ठिकाण आहे जेथे आपण आठवड्यात 60-70% परतावा मिळवू शकता. एफडीमध्ये यासाठी आपल्याला बरीच वर्षे लागू शकेल.
तथापि, शेअर बाजाराच्या रिस्क कडेही दुर्लक्ष करू नका आणि केवळ आर्थिक सल्लागार किंवा ब्रोकिंग फर्मच्या सल्ल्यानुसार निवडक स्टॉकमध्ये गुंतवणूक करा. येथे आम्ही अशा चांगला परतावा देणाऱ्या शेअर्सची माहिती देणार आहोत ज्यांनी गेल्या आठवड्यात 82 % पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
भंडारी होजरी :- भंडारी होजरी शेअरने गेल्या एका आठवड्यात 82.73 टक्के रिटर्न दिला आहे. हा शेअर 23 डिसेंबर रोजी 1.39 रुपयांवर बंद झाला होता, तर आज तो प्रति शेअर 2.54 वर बंद झाला. कंपनीचे बाजार भांडवल 37.22 कोटी आहे. बाजाराच्या भांडवलाच्या बाबतीत ही एक छोटी कंपनी आहे आणि अशा कंपन्यांमध्ये अस्थिरता बरीच जास्त असते. म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी यात असणारी रिस्क विसरू नका.
बीसीपीएल रेलवे :- बीसीपीएल रेल्वेच्या शेअर्सने केवळ एका आठवड्यात 55.13 टक्के नफा दिला आहे. बीसीपीएल रेल्वेचा स्टॉक 23 डिसेंबर रोजी 58.50 रुपयांवर बंद झाला तर आज 30 डिसेंबरला 90.75 रुपयांवर बंद झाला. 55 टक्के परताव्याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले असेल तर एका आठवड्यात त्याला 1.10 लाख रुपयांचा नफा झाला असता.
मोहोटा इंडस्ट्रीज :- मोटोटा इंडस्ट्रीजचा शेअरही रिटर्न देण्यात मागे राहिलेला नाही. आठवड्यात ह्या शेअरने 53.52 टक्के रिटर्न दिले. 23 डिसेंबर रोजी मोहोटा इंडस्ट्रीजचा शेअर 8.52 रुपयांवर बंद झाला तर आज 30 डिसेंबरला ते 13.08 रुपयांवर बंद झाला. या कंपनीचे बाजार भांडवल 19.18 कोटी रुपये आहे.
प्रीतीश नंदी :- प्रीतीश नंदीच्या शेअर्समध्ये फक्त एका आठवड्यात 49.39% नफा झाला आहे. 23 डिसेंबर रोजी प्रीतीश नंदीचा स्टॉक 16.40 रुपयांवर बंद झाला तर आज 30 डिसेंबर रोजी 24.50 रुपयांवर बंद झाला आहे. आईएफजीएल रीफ्रैक्ट्रीज आमच्या यादीतील अंतिम नाव आयएफजीएल रेफ्रेक्टरीज आहे.
आयएफजीएल रेफ्रेक्टरीजच्या शेअर मध्ये गेल्या एका आठवड्यात 47.34 टक्क्यांने जबरदस्त रिटर्न दिला आहे. आयएफजीएल रेफ्रेक्टरीजचा स्टॉक 23 डिसेंबर रोजी 200.25 रुपयांवर बंद झाला तर आज 30 डिसेंबरला 295.05 रुपयांवर बंद झाला आहे. या कंपनीची साइज किंचित मोठी आहे. याची बाजारपेठ 1,063.34 कोटी रुपये आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे 295.05 रुपये पातळी देखील मागील 52 आठवड्यांमधील उच्च पातळी आहे.