LIC Policy : दररोज फक्त 75 रुपयांची गुंतवणूक तुमच्या मुलीला बनवेल श्रीमंत; आताच करा गुंतवणूक…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Policy : आज प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याबद्दल चिंतीत आहे. विशेषतः जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाच्या भविष्याचा विचार करावा लागतो. बदलत्या काळाचा विचार करता आर्थिक परिस्थिती चिंतेचे कारण बनत आहे. अगदी मुलांच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पालकांनी बचत करणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की आपल्या सर्वांना अशा ठिकाणी गुंतवणूक करायला आवडते जिथून आपल्याला मजबूत परतावा मिळेल आणि पैशांची सुरक्षितता मिळेल.

आज आम्ही अशीच एक योजना घेऊन आलो आहोत. जी तुमच्या मुलींच्या भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या उपयुक्त ठरेल,आम्ही सध्या LIC च्या एका पॉलिसीबद्दल बोलत आहोत जिचे नाव कन्यादान पॉलिसी असेल आहे, या योजनेत तुम्ही दररोज फक्त 75 रुपये गुंतवून उत्तम परतावा कमवू शकता.

कन्यादान पॉलिसी ही LIC च्या सुरक्षित योजनांपैकी एक आहे. मुलींचे शिक्षण, लग्न आदी खर्च भागवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. या पॉलिसीमध्ये दर महिन्याला गुंतवणूक करून तुम्ही मजबूत परतावा मिळवू शकता. तुम्ही या या योजनेत अनेक प्रकारच्या पर्यायांसह गुंतवणूक करू शकता.

एलआयसी कन्यादान पॉलिसी पात्रता?

-या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वडिलांचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल ५० वर्षे असावे.

-मुलीचे किमान वय 1 वर्ष असावे.

-कोणतीही व्यक्ती किमान 1 लाख रुपयांचा विमा घेऊ शकते.

-योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही.

-या योजनेची पॉलिसी मुदत 13 वर्षे ते 25 वर्षे आहे.

-प्रीमियम भरण्याची मुदत शून्य ते 3 वर्षे आहे.

-प्रीमियम पेमेंट पर्याय मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आहेत.

-वडील किंवा आई पॉलिसी खरेदी करू शकतात. मुलगी स्वतः ते विकत घेऊ शकत नाही.

एलआयसी कन्यादान पॉलिसीचे फायदे

-विमाधारक पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपये तात्काळ दिले जातात.

-अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 5 लाख रुपये तात्काळ दिले जातात.

-परिपक्वतेच्या तारखेपर्यंत दरवर्षी 50,000 रुपये दिले जातात.

-भारताच्या प्राप्तिकर कायदा 1961 नुसार कर सूट मिळू शकते.

जर तुम्ही कन्यादान पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यास पात्र असाल तर तुम्ही दररोज 75 रुपये गुंतवू शकता. तुम्ही दरमहा 75 रुपये गुंतवल्यास तुम्ही 2,250 रुपये बचत कराल. तुम्हाला ही गुंतवणूक 25 वर्षांच्या कालावधीसाठी सुरु ठेवावी लागेल. 25 वर्षांनंतर तुम्हाला परिपक्वतेवर 14 लाख रुपये दिले जातील.