आर्थिक

Agri Business Idea: शेती करत असताना कमी खर्चात गावात सुरू करा ‘हा’ व्यवसाय! आयुष्यभर खेळाल पैशात

Published by
Ajay Patil

Agri Business Idea:- व्यवसाय म्हटले म्हणजे कमीत कमी गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल अशा व्यवसायाची आखणी करणे किंवा असा व्यवसाय सुरू करणे हे खूप महत्त्वाचे आहे. परंतु प्रत्येकाची इच्छा अशाच प्रकारचा व्यवसाय सुरू करण्याची असते. परंतु व्यवसायांची यादी भली मोठी असल्यामुळे कोणता व्यवसाय सुरू करावा याबाबत बरेच जण गोंधळात पडतात.

परंतु व्यवसाय सुरू करताना आपण शेतीशी निगडित असलेले आणि ग्रामीण भागात प्रामुख्याने चांगली मागणी असलेल्या व्यवसायाची निवड केली तर नक्कीच कमी गुंतवणुकीत तुम्ही आयुष्यभर चांगला पैसा मिळवू शकतात. शेती संबंधित असलेल्या व्यवसायांचा विचार केला तर यामध्ये शेती मध्ये उत्पादित होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादन विक्रीचा व्यवसाय हे आर्थिक दृष्टिकोनातून खूप फायद्याचे ठरतात.

अगदी याच पद्धतीने तुम्हाला देखील ग्रामीण भागामध्ये राहून शेतीशी निगडित असलेला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी डाळ मिल बिजनेस म्हणजेच डाळ प्रक्रिया उद्योग हा खूप महत्त्वाचा ठरू शकतो.

महिला बचत गट किंवा बेरोजगार असलेल्या तरुणांनी जर डाळ मिल उद्योगांमध्ये पाऊल ठेवले तर नक्कीच या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होतीलच, परंतु पैसे देखील चांगले मिळतील. महत्वाचे म्हणजे तुम्हाला यामध्ये बँकेकडून देखील आर्थिक मदत होऊ शकते. तुम्हाला देखील कमीत कमी भांडवलात चांगला उद्योग उभा करायचा असेल तर डाळ मिल उद्योग हा एक उत्तम पर्याय आहे.

 कमी भांडवलात सुरू करा डाळ मिल उद्योग

हा उद्योग कमीत कमी भांडवलात तुम्ही सुरू करू शकतात व सहजतेने हा ग्रामीण भागात उभा राहू शकतो. आपल्याला माहित आहे की या उद्योगांमध्ये प्रामुख्याने तूर डाळ तयार केली जाते व या प्रक्रियेमध्ये तूर भरडली जाते व टरफले काढून नंतर डाळ वेगळी केली जाते. यामध्ये चांगल्या प्रतीची डाळ आणि कमीत कमी चूरी आणि पावडर मिळेल अश्या पद्धतीने भरडण्याची क्रिया होणे खूप गरजेचे असते.

डाळ मिल उद्योगातून तीन ग्रेडमध्ये डाळीचे उत्पादन आपल्याला मिळते. जर या तीन ग्रेड पाहिल्या तर यातील एक नंबरच्या ग्रेडला फटका, दोन ग्रेड म्हणजे समान नंबर आणि ग्रेड तीन म्हणजे साधारण अशी डाळ असते व या ग्रेडनुसार तुम्हाला तयार डाळीची किंमत बाजारात मिळत असते. या प्रक्रिया उद्योगांमध्ये डाळ तयार करताना जो काही भुसा किंवा चूरी तयार होते ते देखील फायद्याचे ठरतात. यामध्ये तुम्ही तुरच नाही तर हरभरा तसेच मसूर व चवळी तसेच सोयाबीन पासून देखील डाळी बनवू शकतात.

 डाळ मिल उभारण्यासाठी आवश्यक गोष्टी

डाळ मिल जर तुम्हाला उभारायची असेल तर अगोदर तुम्ही अशा ठिकाणाची निवड करावी ज्या ठिकाणी तुम्हाला कच्चामाल सहजतेने उपलब्ध होईल. आपल्याला माहित आहे की,बरेच शेतकरी प्रत्येक वर्षाला 10 ते 20 टनापर्यंत देखील तूर किंवा मूग आणि उडदाचे उत्पादन घेत असतात. शेतकऱ्यांना तुम्ही डाळ तयार करून देऊ शकतात

किंवा त्यांच्याकडून डाळ तयार करण्यासाठी कडधान्य घेऊ शकतात. डाळ मिल उभारण्यासाठी तुमच्याकडे 50 चौरस मीटरची एक खोली तसेच 200 चौरस मीटरची जागा सर्वसाधारणपणे मेन रस्त्यावर असणे गरजेचे आहे. तसेच एक तांत्रिक मजूर तसेच पाच किलो वॅटचा विद्युत पुरवठा  डाळ मिलसाठी आवश्यक असतो.

 डाळ मिल उद्योगांमध्ये आधुनिक पद्धत ठरते फायद्याची

या उद्योगामध्ये आता अनेक प्रकारचे तंत्रज्ञान आलेले आहे. जेव्हा कडधान्यांमध्ये त्यांचे टरफले डाळीला चिकटलेली असतात तेव्हा तिची चिकटलेली टरफले वेगळी करणे व त्यापासून डाळ तयार करणे हे एक अवघड काम असते. कडधान्य ओलवणे आणि ते वाळवणे ही प्रक्रिया करतात. यामध्ये काहीशा प्रमाणात टरफलांचा भाग डाळीपासून वेगळा होतो.

परंतु पारंपारिक पद्धतीने जर कडधान्य प्रक्रिया केली तर डाळींचे उत्पादन करताना म्हणजे डाळ तयार करताना घर्षण होऊन ऊर्जा म्हणजेच वीज जास्त वापरली जाते व साहजिकच खर्च वाढतो.

त्यामुळे तुम्हाला जर खर्च कमी करायचा असेल तर तुम्ही आधुनिक पद्धतीचा वापर करणे खूप गरजेचे आहे व या आधुनिक पद्धतीचा वापर केल्यामुळे डाळींचे उत्पादन तुम्ही चक्क 82 ते 85 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. तसेच डाळींचा चुरा हा पशुखाद्य म्हणून देखील तुम्ही वापरू शकता किंवा त्याची विक्री करू शकतात.

त्यामुळे सखोल माहिती घेऊन डाळ मिल उद्योग सुरू करणे हे शेतकऱ्यांसाठी किंवा शेतकरी कुटुंबातील तरुणांसाठी फायद्याचे ठरेल.

Ajay Patil