आर्थिक

इंजिनिअरिंग केले व बूटपॉलिश करायला लागला, सारे जग हसले पण तो थांबला नाही..आज उभी केली करोडो रुपयांची कंपनी

Published by
Ahmednagarlive24 Office

बिझनेस, स्टार्टअप आदी शब्द नेहमीच तुमच्या कानावर पडत असतील. काही स्टार्टअप किंवा बिझनेस कसे मोठे झाले याच्या यशोगाथाही तुम्ही वाचल्या असतील. अनेक लोकांकडे भांडवल असते तर ते डायरेक्ट बिझनेस सुरु करतात व मोठे होतात. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत की ज्याने लोकांचे शूज पॉलिश केले.

या शूज पॉलिश मधून करोडो रुपयांची कंपनी बनवली आहे. ऐकून थोडं विचित्र वाटल असेल ना? पण तुम्ही बरोबर ऐकले आहे. या व्यक्तीने शूज पॉलिश करून एक कोटी रुपयांची कंपनी उभी केलीये.

आज आपण सर्व लोक शू पॉलिशिंगला लहान सहान काम समजतो. पण यातच करिअर करत व अनोखी आयडिया वापरत या व्यक्तीने करोडो रुपयांची कंपनी उभी केली आहे. कोणतेही काम छोटे नसते हेच जणू याने सिद्ध केले आहे. या व्यक्तीचे नाव संदीप गजकास असून त्यांनी भारतातील पहिली ‘शू लाँड्री’ कंपनी उभी केली आहे.

या कंपनीमध्ये लोकांच्या बूटांची साफसफाई आणि दुरुस्ती करून पैसे कमवले जातात. छोट्या गोष्टीतून सुरु झालेली ही कंपनी आज करोडो रुपयांपर्यंत कशी गेली याबद्दल जाणून घेऊयात

अशी झाली होती संदीप यांची सुरवात

संदीप गजकस हे मुंबईत राहतात. त्यांचे शिक्षण म्हणाल तर त्यांचे इंजीनियरिंग झाले आहे. इंजीनियरिंग केल्यानंतर नोकरीसाठी प्रदेशात जाण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण त्याचवेळी नेमकी अमेरिकेत 9/11 ची घटना घडली.

या घटनेनंतर संदीपने परदेशात जाण्याचा प्लॅन रद्द केला. त्याने येथेच राहून आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या 12 हजारांत “द शू लाँड्री” कंपनी सुरू केली. या व्यवसायाची सुरवात त्यांनी त्यांच्या घरातच केली. स्वतःचे तळघर तोडून तेथे वर्कशॉप बनवले. तेथे आपला व्यवसायाची सुरवात केली.

सुरुवातीला संदीपने आपल्या मित्रांवर याचा प्रयोग केला. त्याने मित्रांचे जुने घाणेरडे शूज स्वच्छ केले. ज्यांचे शूज खराब झाले होते ते शूज दुरुस्त करून दिले. या कामाने त्याचे मित्र चांगलेच प्रभावित झाले. संदीपचा आत्मविश्वास या गोष्टींमुळे वाढत गेला. त्याने हे काम सुरू ठेवले व हळू हळू ते वाढवत नेले.

सर्वत्र होऊ लागला विरोध

संदीपने शू पॉलिशिंगचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्याला विरोध होऊ लागला. घरातील व्यक्ती तर संपूर्णपणे नाखूष होते. मुलाला इंजिनीअरिंगचे शिक्षण दिले व त्याने शूज पॉलिश करण्याचे काम सुरू केले हे कोणत्याच पालकाला मान्य होणार नाही. त्यामुळे संदीप शूज पॉलिश करायला लागल्यानंतर त्यांना विरोध होऊ लागला.

त्याचे कुटुंबीय त्याच्यावर खुश तर नव्हतेच पण अनेक लोक टोमणे देखील देऊ लागले. तू इंजिनिअरिंग केलेस आणि बूट पॉलिश करायला लागलास, तुला कोठे नोकरी मिळाली नाही वाटतंय असे टोमणे मिळाले. पण संदीपने शू पॉलिशिंगचा व्यवसाय सुरूच ठेवला , तो अजिबात मागे हटला नाही. या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपले काम त्याने सुरूच ठेवले.

मेहनत व जिद्दीतून उभी राहिली करोडोंची कंपनी

संदीप गजकस यांनी 2003 मध्ये “द शू लाँड्री” ही कंपनी सुरू केली होती. अनेक विरोधानंतरही त्यांनी मेहनत सुरूच ठेवली. आज अनेक राज्यांत त्यांच्या कंपनीची फ्रेंचाइजी आहे. आज “द शू लाँड्री” कंपनीची उलाढाल कोटींवर पोहोचली आहे.

ऐकून धक्का बसेल पण आज या कंपनीची फ्रँचायझी भारतातील 10 वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहे. सुरुवातीला संदीपला पाहून हसणारे लोक आश्चर्यचकित झाले आहेत. स्वतःवर विश्वास ठेवत मेहनतीच्या जोरावर त्याने “The Shoe Laundry” नावाची कंपनी मोठी केली व आज त्याची एक कोटी व्हॅल्युएशन असणारी कंपनी बनली आहे.

Ahmednagarlive24 Office