अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि त्यासह काही महत्त्वपूर्ण कामांची अंतिम मुदत हळूहळू जवळ येत आहे. यात काही फाइनेंशियल डेडलाइन आहेत ज्या आपल्या खिशावर थेट परिणाम करतील.
अशा परिस्थितीत आपण या अंतिम मुदतीच्या आधी अपूर्ण कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. जाणून घ्या ती कामे आणि त्यांच्या डेडलाईन्स –
या आहेत महत्त्वपूर्ण डेडलाइन : –
1. आयटीआर फाइलिंग: केंद्र सरकारने इनकम टॅक्स रिटर्न अर्थात आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 10 जानेवारीपर्यंत वाढविली आहे. आयटीआर आर्थिक वर्ष 2019-20 (मूल्यांकन वर्ष 2020-21) ची अंतिम मुदत 31 डिसेंबर रोजी संपत होती. ती आता वाढवली आहे.
2. 28 फेब्रुवारी 2021: पेन्शनसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. नुकतीच पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी करण्यात आली. लाखो पेन्शनधारक याचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत आपण हे काम वेळेत पूर्ण केले पाहिजे.
3. PAN- Aadhaar लिंकिंग: अलीकडेच वित्त मंत्रालयाने बँकांना ग्राहकांची बँक खाती आधारशी जोडण्यास सांगितले आहे. म्हणजेच बँकेचे प्रत्येक खाते आधार कार्डाशी जोडणे आवश्यक आहे. आतापर्यंत आधारशी संबंधित नसलेली खाती 31 मार्च 2021 पर्यंत जोडावीत, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर पॅन-आधार लिंक करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास पॅन अवैध होऊ शकतो. पॅनला आधार जोडण्यासाठी सरकारने 30 जून 2020 ते 31 मार्च 2021 पर्यंत मुदत दिली आहे.