आर्थिक

पीएफ खात्यातून तुम्हाला देखील पैसे काढायचे आहेत का? तर वाचा पैसे काढण्यासाठी बदलण्यात आलेले नियम

Published by
Ajay Patil

अनेक जण सरकारी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी करतात व नोकरी करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्यांचे हे प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ खाते असते. या पीएफ खात्यामध्ये महिन्याला मिळणाऱ्या पगारातून काही रक्कम कापली जाते व ती पीएफ खात्यामध्ये जमा केली जात असते व त्यासोबतच तुमची नियोक्ता कंपनीचे देखील पीएफ खात्यामध्ये योगदान असते.

अशाप्रकारे कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यामध्ये रक्कम जमा होत असते. परंतु बऱ्याचदा काही आपत्कालीन परिस्थिती जर उद्भवली तर बरेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते अर्थात पीएफ खात्यातून पार्शल विड्रॉल म्हणजेच अंशतः रक्कम काढतात व तशी मुभा त्यांना असते.

परंतु हे पैसे काढताना काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे असते. पीएफ खात्यामधून तुम्हाला जर अशा प्रकारची रक्कम काढायची असेल तर त्याकरीता असलेल्या नियमांमध्ये 1 एप्रिल 2024 पासून काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत व त्याकरिता तुम्ही कोणत्या कामासाठी किती पैसे काढू शकतात? याबद्दल काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.

 पीएफ खात्यातून कोणत्या कामासाठी किती रक्कम काढता येते?

1- इमर्जन्सी मेडीकल खर्च कर्मचारी हा स्वतः सोबतच त्याची पत्नी, मुले, आई वडील किंवा भावंडे यांच्याकरिता तातडीच्या वैद्यकीय उपचाराकरिता पीएफ खात्यातून अंशतः रक्कम काढू शकतो.

यामध्ये खात्यातील योगदान व त्यावरील व्याज किंवा सहा महिन्याचा पगार यापैकी सर्वात कमी असणारी रक्कम मिळते. या कामाकरिता पैसे काढण्यासाठी नोकरीच्या कालावधीची अट नाही.

2- विवाहाच्या खर्चाकरिता कर्मचाऱ्यांचे स्वतःचे लग्न किंवा मुले आणि भावंडांच्या लग्नाकरिता पीएफ मधून रक्कम काढता येणे शक्य आहे.

याकरिता पीएफ खात्यातील योगदान व त्यावरील व्याज या दोन्हींच्या एकत्रित शिल्लक असलेल्या रकमेच्या कमाल 50 टक्के रक्कम काढता येते. यामध्ये महत्त्वाचा नियम असा आहे की संबंधित कर्मचाऱ्याची किमान सात वर्षे नोकरी झालेली असणे गरजेचे आहे.

3- नवीन घर विकत घेणे किंवा बांधणे नवीन घर बांधायचे असेल किंवा नवीन घर विकत घ्यायचे असेल तर तुम्हाला पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. परंतु यामध्ये संबंधित घराची नोंदणी स्वतःच्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने असणे गरजेचे आहे.

त्यामध्ये कर्मचाऱ्यांचा 36 महिन्याचा पगार किंवा घराची किंमत यातील जे कमी असेल तेवढी रक्कम पीएफ खात्यातून काढता येते. या कामाकरिता पैसे काढायचे असतील तर कर्मचाऱ्याची कमीत कमी पाच वर्षे नोकरी पूर्ण झालेली असणे आवश्यक आहे.

4- घराचे नूतनीकरण याकरिता जर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर कर्मचाऱ्यांच्या बारा महिन्याच्या पगाराइतकी रक्कम खात्यातून काढता येते.

घराच्या नूतनीकरणासाठी पैसे काढताना किमान कर्मचाऱ्याची पाच वर्ष नोकरी झालेली असणे गरजेचे आहे व संबंधित घराची नोंदणी स्वतःच्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने असावी.

5- होमलोनची परतफेड होम लोनच्या  परतफेडीकरीता पैसे काढायचे असतील तर पीएफ मधील शिल्लक रकमेच्या 90 टक्के रक्कम ही गृह कर्जाच्या परतफेडीसाठी काढू शकतात. परंतु याकरिता तीन वर्ष नोकरी झालेली असेल आणि संबंधित घराचे नोंदणी स्वतःच्या किंवा पती-पत्नीच्या संयुक्त नावाने असणे गरजेचे आहे.

6- शैक्षणिक खर्चाकरिता शिक्षणाच्या खर्चा करिता तुम्हाला पैसे काढायचे असतील तर एकूण पीएफमधील योगदानाचे 50% पर्यंत रक्कम तुम्हाला काढता येते.

या प्रकारचा खर्च दहावीनंतरच्या शिक्षणासाठीच असावा लागतो. शिक्षणासाठी खर्च करिता पीएफ मधून पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची किमान सात वर्ष नोकरी झालेली असणे गरजेचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil