ATM Services : बदलत्या काळानुसार भारतातील बँकिंग व्यवस्थेत अनेक मोठे बदल झाले आहेत. आजकाल, लोक पैसे काढण्यासाठी बँकेत लांब रांगेत उभे राहण्याऐवजी एटीएममधून पैसे काढणे पसंत करतात. अशातच एटीएमचा वापर वाढल्याने त्याच्याशी संबंधित फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
अनेक वेळा लोकांची छोटीशी चूक त्यांना खूप महागात पडते. आज आम्ही तुम्हाला अशाच सामान्य चुकांबद्दल सांगणार आहोत ज्या कोणत्याही एटीएम कार्ड वापरकर्त्याने टाळल्या पाहिजेत. अन्यथा त्याला मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागू शकते.
एटीएम वापरताना ‘या’ चुका टाळा !
-अनेकदा असे दिसून आले आहे की जेव्हा लोकांना एटीएम मशीनमधून पैसे काढण्यात अडचण येते तेव्हा ते पैसे काढण्यासाठी जवळ उभ्या असलेल्या अज्ञात व्यक्तीची मदत घेतात. अशा परिस्थितीत फसवणूक करणारे मदतीच्या नावाखाली एटीएम कार्ड बदलून तुमच्याकडून पिनची माहिती घेतात. यानंतर ते तुमचे खाते रिकामे करतात. अशा परिस्थितीत तुम्ही एटीएम वापरण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळावे.
-हे लक्षात ठेवा की तुम्ही अशाच एटीएमचा वापर करावा जे खूप गर्दीच्या ठिकाणी असेल. फसवणूक करणारे एटीएम डेटा चोरण्यासाठी वापर न होणाऱ्या एटीएम मशीनमध्ये असे उपकरण बसवतात. ज्यामुळे तुमच्या कार्डचे सर्व तपशील चोरीला जातात, गर्दीच्या एटीएममध्ये लोकांची ये-जा असल्याने हे अशा प्रकारचे उपकरण बसवणे अवघड असते, अशा परिस्थितीत गर्दीच्या ठिकाणी असलेलेच एटीएम वापरावे.
-आजकाल, बरेच सायबर गुन्हेगार लोकांना बँक तपशील, लॉटरी, केवायसीच्या नावावर कॉल करतात आणि त्यांच्या वैयक्तिक तपशीलांची माहिती विचारतात जसे की आधार क्रमांक, पॅन क्रमांक, एटीएम कार्डचा सीव्हीव्ही क्रमांक, ओटीपी इत्यादी. अशा परिस्थितीत, नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही असे तपशील कोणाशीही शेअर करू नका.
-अनेकांना त्यांच्या डेबिट कार्डचा म्हणजेच एटीएम कार्डचा पिन बराच काळ न बदलण्याची सवय असते. पण असे करणे टाळावे, दर काही दिवसांनी तुमचा पिन बदलत राहण्याचा प्रयत्न करा. याद्वारे तुम्ही एटीएम फ्रॉडची शक्यता अनेक पटींनी कमी करू शकता.