Business Idea:- सध्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांच्या वापर होऊ लागला असून बऱ्याच लोकांचा ट्रेंड आता इलेक्ट्रिक वाहन खरेदी कडे वाढताना दिसून येत आहे. यामागील जर आपण कारणांचा शोध घेतला तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा फायदेशीर असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकरिता प्रोत्साहन दिले जात आहे.
सध्या भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची सुरुवात होत आहे परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये भारताच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने धावताना दिसतील व तेव्हा मात्र या इलेक्ट्रिक वाहनांना चार्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनची गरज भासेल.
त्यामुळे आत्तापासून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय जर सुरू केला तर येणाऱ्या कालावधीत खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा या व्यवसायातून मिळू शकतो. याच व्यवसायाविषयीची माहिती आपण या लेखात घेऊ.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन म्हणजे नेमके काय?
ज्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेल इत्यादी वाहनांसाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंप उभारण्यात आलेले आहेत. अगदी त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी देखील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन लागणार आहेत व त्या आता मोठ्या प्रमाणावर उभारण्याचे काम सुरू आहे.
त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन वापरणारे प्रवासी प्रवास करत असताना चार्ज उतरल्यानंतर किंवा चार्जिंग कमी असताना इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन मधून काही पैसे देऊन त्यांचे वाहन चार्ज करू शकणार आहेत. भारतामध्ये असे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन स्थापन करणाऱ्या कंपन्या आता उदयास येत आहे.
त्यामुळे अशा कंपन्यांसोबत पार्टनरशिप करून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन व्यवसाय सुरू करण्याची संधी अशा कंपन्या देत आहेत. तुमच्याकडे चांगल्या प्रकारे पैसा असेल तर तुम्ही स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता किंवा अशा कंपनीची फ्रेंचाइजी देखील घेऊ शकतात.
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन नेमके कोणत्या ठिकाणी उघडायचे?
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन जर उभारायचे असेल तर तुम्ही ते रेल्वे स्टेशनच्या बाहेर, पेट्रोल पंपाजवळ किंवा एखादा शॉपिंग मॉल जवळ, एखादे मोठे बस स्टॅन्ड असेल तर त्याच्या बाहेर उभारू शकतात. याशिवाय तुम्ही महामार्गाच्या बाजूला देखील इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारू शकतात.
इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल?
तुम्हाला स्वतःचे इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उघडायचे असेल तर तुम्ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडे अर्ज करू शकतात किंवा एखाद्या प्रसिद्ध कंपनीच्या माध्यमातून त्या कंपनीची फ्रेंचाइजी घेऊन देखील तुम्ही इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा व्यवसाय करू शकतात. कारण सध्याच्या कालावधीमध्ये भारतात अनेक कंपन्या त्यांच्या फ्रॅंचाईजी देत आहेत.
चार्जिंग स्टेशनसाठी किती खर्च येईल?
तुम्हाला जर स्वतःचे इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उघडायचे आहे की कंपनीचे फ्रॅंचायजी घेऊन या व्यवसायाला सुरुवात करायची आहे, यावर तुमच्या व्यवसायाची गुंतवणूक किंवा खर्च ठरणार आहे. त्यामध्ये देखील सरकारचे काही नियम असून त्यांचे पालन करणे तुम्हाला खूप गरजेचे आहे.
तसेच सरकारच्या या नियमांमध्ये बऱ्याचदा वेळोवेळी बदल होण्याची शक्यता असल्यामुळे तुम्ही या नियमांच्या बाबतीत कायम स्वतःला अपडेट ठेवण्याची गरज आहे.
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन व्यवसायामध्ये किती मिळू शकतो नफा?
इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन उभारल्यानंतर तुम्ही वाहन मालकाकडून चार्जिंग करण्याकरिता किती पैसे घेत आहात त्यावर तुमची कमाई अवलंबून असणार आहे व याशिवाय तुमच्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनचा प्रकार आणि किंमत यावर देखील ते अवलंबून असणार आहे. जर आतापासून या व्यवसायामध्ये उडी घेतली तर येणारा काळ हा या व्यवसायासाठी खूप उज्वल असणार हे मात्र निश्चित.