Categories: आर्थिक

मोबाईल घ्यायचाय ? थोडं थांबा ! नववर्षात लॉन्च होतायेत ‘हे’ शानदार स्मार्टफोन्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- आता 2020 संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. हे वर्ष तसे अनेक संकटांनी भरलेले गेले. आता नवीन वर्ष सुरु होईल. नवीन वर्ष नव्या जोमाने सुरु करण्यास अनेक लोक उत्सुक आहेत.

अनेक लोकांना नव्या वर्षात अनेक गोष्टी खरेदीही करायच्या आहेत. या वर्षाच्या अखेरीस आपण स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. नवीन वर्षात शानदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. या स्मार्टफोन्सची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

शाओमी रेडमी नोट 10 प्रो :- हा स्मार्टफोन 6 जानेवारी 2021 रोजी लॉन्च होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. यामध्ये 6GB रॅम आहे. या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा आहे. मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह 64+8+5+5MP चा आहे आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 5100 mAh बॅटरी, फास्ट चार्जिंग यूएसबी टाईप-सी पोर्ट आहे. इंटरनल मेमरी 64GB असून ती 512GB पर्यंत वाढवू शकतो.

एमआय 10i :- हा 5 जानेवारीला भारतात लॉन्च होऊ शकतो. कंपनीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ टीझर जारी केला आहे, जरी टीझरमध्ये स्पष्टपणे स्मार्टफोनचे नाव नाही, परंतु हे सूचित करतो की 108-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि क्वाड-कॅमेरा सेटअप असलेला एक नवीन फोन 5 जानेवारीला लाँच होईल.

मागील लीक झालेली माहिती पाहता असा अंदाज आहे की हा फोन एमआय 10 आयई असेल. आधीच्या एका अहवालात असेही सुचवले गेले होते की हा फोन भारतात नोट 9 प्रो 5 जी ची पुनर्ब्रांडेड आवृत्ती म्हणून लॉन्च केला जाऊ शकतो जो नुकताच चीनमध्ये 108 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेर्‍यासह लाँच करण्यात आला होता. चिनी 5 जी मॉडेल भारतात लॉन्च झालेल्या रेडमी नोट 9 प्रो मॉडेलपेक्षा वेगळे असेल.

सॅमसंग गॅलेक्सी A52 :- हा स्मार्टफोन 18 जानेवारी 2021 मध्ये लॉन्च होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याची किंमत 19,999 रुपये इतकी असण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आहे. डिस्प्ले 6.5 इंचाचा आहे. यामध्ये मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह 64+12+5+5 MP आहे आणि 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 4000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये इंटरनल मेमरी 128GB दिली असून ती 512GB पर्यंत वाढवता येईल.

रियलमी X7 :- हा स्मार्टफोन 26 जानेवारी 2021 रोजी लॉन्च होण्याची शक्यता आहे. त्याची किंमत 19,290 रुपये असणार आहे. या फोनमध्ये 6 GB रॅम देण्यात आला असून डिस्प्ले 6.43 इंचाचा आहे. फोनमध्ये मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह 64+8+2+2 MP इतका आहे. फ्रंट कॅमेरा 32MP आहे. इंटरनल मेमरी 128GB इतकी असून ती वाढवता येणार नाहीये. फोनमध्ये 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

वन प्लस नॉर्ड N100 :-

हा स्मार्टफोन जानेवारी 2021 मध्ये लॉन्च होईल. त्याची किंमत 15,690 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 4GB रॅम असून डिस्प्ले 6.52 इंच इतका आहे. फोनमध्ये मेन कॅमेरा एलईडी फ्लॅशसह 13MP + 2MP + 2MP चा आहे. 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये इंटरनल मेमरी 64 GB असून ती 256GB पर्यंत वाढवता येईल. फोनची बॅटरी 5000 mAh इतकी आहे.
अहमदनगर लाईव्ह 24