अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-आयकर परतावा भरण्यास 31 डिसेंबर शेवटची तारीख असल्याने सर्व्हरवर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे अनेकांना आपला आयटी रिटर्न वेळेत भरणे शक्य होत नव्हते.
त्यातच दिलेल्या वेळेत रिटर्न भरू न शकल्याने करदात्याला दंड भरावा लागणार हि चिंता सतावत होती. यामुळे सोशल मीडियावर आयकर भरण्यास मुदतवाढ देण्याती मागणी करण्यात येत होती.
यावर पुन्हा एकदा केंद्र सरकारने सकारत्मक पाऊल उचलत करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सामान्य लोकांना, नोकरदारांना आयकर भरण्यास 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
म्हणजेच ही मुदतवाढ केवळ 12 दिवसांसाठी देण्यात आली आहे. अर्थमंत्रालयाने याची घोषणा केली. तर ज्यांच्या खात्यांचे ऑडिट शिल्लक आहे त्यांना व त्यांच्या पार्टनरसाठी 2020-21 चा आयकर भरण्यासाठी 15 फेब्रुवारीची नवीन डेडलाईन देण्य़ात आली आहे.