Business Idea : आजकाल अनेक लोक नोकरीच्या, कमी पगाराच्या कामांमुळे त्रासलेले आहेत. अनेकांना आपल्या दैनंदिन गरजही भागवता येत नाहीत. त्यामुळे अनेकांना काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असते. एखादा बिझनेस करण्याची इच्छा असते.
परंतु काय करावे सुचत नाही. आज आम्ही तुम्हाला एक आयडिया सांगणार आहोत कि ज्याद्वारे तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. विशेष म्हणजे या बिझनेससाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज नाही. केवळ 15 हजार रुपयांत तुम्ही हे सुरु करू शकता.
यातून तुम्ही तीन लाख कमावू शकता. आहे की नाही प्रॉफिटच प्रॉफिट. आणि यावर आणखी भारी म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून तुम्हाला विशेष मदतही मिळणार आहे.
ही आयडिया आहे. तुळस फार्मिंग अर्थात तुळशीची शेती. याबद्दल विस्ताराने जाणून घेऊयात –
तुळस लागवड करण्यासाठी तुम्हाला ना मोठ्या जमिनीची गरज आहे ना मोठ्या गुंतवणुकीची. यासाठी थोडी शेती असणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत की ज्या तुमच्याशी यासाठी करार देखील करतात. म्हणजेच तुमच्या उत्पन्नास हमखास ग्राहक मिळतील. यातून तुम्हाला लाखोंची कमाई होऊ शकते.
या कंपन्यांसोबत करू शकता कॉन्ट्रॅक्ट
डाबर, पतंजली, वैद्यनाथ आदी आयुर्वेदिक औषधे बनवणाऱ्या कंपन्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुळशीची लागवड करू शकता. या कंपन्या स्वतः पीक खरेदी करतात. तुळशीच्या बिया आणि त्यापासून बनणाऱ्या तेलासाठी मोठी बाजारपेठ आहे.
खूप मोठ्या दराने तेल आणि तुळशीच्या बिया विकल्या जातात. म्हणजेच तुम्हाला कामाचे चान्सेस जास्त आहेत.
* विविध आजारांवर रामबाण उपाय
तुळशीचा संबंध सामान्यतः धार्मिक गोष्टींशी जोडलेला असतो. परंतु औषधी गुणधर्म असलेल्या तुळशीपासून पैसेही मिळू शकतात. तुळशीचे अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये युजेनॉल आणि मिथाइल सिनामेट असते.
याचा उपयोग कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर औषधे बनवण्यासाठी केला जातो. एक हेक्टर जमिनीत तुळस लागवड केल्यास सुमारे 15 हजार रुपये खर्च येतो. 3 महिन्यांनंतर हे पीक 3 लाख रुपयांपर्यंत विकले जाते. म्हणजेच तुम्ही तीन महिन्यात लाखोंचा फायदा मिळवू शकता.
* तुळशीची शेती करण्याची योग्य पद्धत
तुळशीची शेती करण्यासाठी वालुकामय चिकणमाती उत्तम मानली जाते. जून-जुलैमध्ये बियांद्वारे रोपे तयार केली जातात. त्यानंतर रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात. लागवड करताना दोन ओळींत 60 सें.मी. आणि दोन रोपामधील अंतर 30 सें.मी. असावे.
साधारण 100 दिवसांत हे रोपे तयार होतात. त्यानंतर काढणी प्रक्रिया सुरू होते.