FD Interest Rate : बँक ऑफ बडोदासह ‘या’ बँका एफडीवर देतायेत सर्वाधिक व्याज; जाणून घ्या तीन वर्षात किती कराल कमाई !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

FD Interest Rate : प्रत्येकाला त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग गुंतवण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून भविष्यातील गरजा भागवता येतील. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. परंतु असे काही पर्याय आहेत ज्यात बाजार जोखीम देखील समाविष्ट आहे. पण जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत कोणतीही जोखीम घ्यायची नसेल तर तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. एफडी मधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.

एफडीमध्ये कोणतीही बाजार जोखीम नसते. याशिवाय, यावर हमी परतावा मिळतो. बँका सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर जास्त परतावा उफ्फर करतात. आज आपण अशाच बँकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सध्या जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक परतावा ऑफर करत आहेत.

सार्वधिक व्याजदर देणाऱ्या बँका :-

बँक ऑफ बडोदा

ही बँक तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के दराने व्याज देत आहे. ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर सर्वाधिक व्याज दर ऑफर करत आज. ज्येष्ठ नागरिकांना 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर येथे तीन वर्षांत 1.26 लाख रुपये मिळतील.

ॲक्सिस बँक

ही बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ७.६० टक्के दराने व्याज देत आहे. या बँकेत तुम्ही तीन वर्षांसाठी केलेली 1 लाख रुपयांची गुंतवणूक वाढून 1.25 लाख होईल. तुम्ही व्याजतूनच २५ हजार कमवाल.

पंजाब नॅशनल बँक

या बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.५० टक्के व्याजदरासह परतावा देतात. तीन वर्षांनंतर परतावा 1.25 लाख रुपये होईल.

याव्यतिरिक्त ICICI बँक आणि HDFC बँक देखील तीन वर्षांच्या कालावधीसाठी केलेल्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 7.50 टक्के व्याजदर देतात. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने तीन वर्षांसाठी 1 लाख रुपयांची एफडी केली तर त्याला कालावधी संपल्यानंतर 1.25 लाख रुपयांचा परतावा मिळेल.