FD interest rates : एफडी गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. म्हणूनच देशातील बरेच लोक येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. तसेच येथे मिळणार परतावा देखील चांगला आहे. अशातच तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे, कारण सध्या अनेक बँका एफडीवर जबरदस्त परतावा ऑफर करत आहेत.
सध्या देशातील 4 बँकांनी एफडीचे दर वाढवले आहेत. यामध्ये सरकारी आणि निमसरकारी अशा दोन्ही बँकांचा समावेश आहे. या बँकांमध्ये एफडी केल्यास ८.६० टक्के व्याज मिळते. यापूर्वीही या बँकांनी व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत, येथे गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.
‘या’ बँकांनी वाढवले व्याजदर
माहितीसाठी, बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपासून ते 10 कोटी रुपयांपर्यंतचे व्याजदर बदलले आहेत. BOI 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के व्याज, 91 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 6 टक्के व्याज, 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर 6.25 टक्के व्याज, 211 दिवस ते 1 पेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.25 टक्के व्याज देते. 6.50 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये 1 वर्षाच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज दिले जात आहे.
तर DCB बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. हे दर 13 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यानंतर सर्वसामान्य ग्राहकांना ८ टक्के तर वृद्धांना ८.६० टक्के व्याज दिले जात आहे. यासोबतच FD वर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3.75% ते 8% पर्यंत व्याज दिले जात आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी FD वर 4.25% ते 8.60% व्याज दिले जात आहे.
कोटक महिंद्रा बँक देखील एफडी गुंतवणूकदारांना 2.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देत आहे. हे व्याजदर 11 डिसेंबरपासून लागू झाले आहेत.
फेडरल बँक देखील त्यांच्या 500 दिवसांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देत आहे. याशिवाय याच कालावधीतील वृद्धांना ८.१५ टक्के दराने व्याज दिले जात आहे.