FD Interest Rates : रिझर्व्ह बँकेकडून पुन्हा एकदा रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. अशातच देशातील काही खासगी बँका मुदत ठेवींवर चांगले व्याज देत आहे. सध्याच्या काळात मुदत ठेवींची सुरक्षित मानली जाते.
त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार या बँकांच्या मुदत ठेवींमध्ये पैसे गुंतवत आहेत, जर तुम्हीही या बँकेत गुंतवणूक केली असेल तर त्याचा तुम्हाला खूप मोठा फायदा होऊ शकतो. तुम्ही घरी बसून हजारो रुपये कमावू शकता. कोणत्या आहेत या बँका? पाहुयात त्यांची यादी.
8 जून रोजी, भारतीय रिझर्व्ह बँकने त्यांच्या चलनविषयक धोरण समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याच दराने रिझर्व्ह बँक इतर बँकांना कर्ज देत असते. जर रेपो दरात बदल झाला तर बँका मुदत ठेवींच्या व्याजदरातही बदल करत असतात. जाणून घेऊया देशातील प्रमुख बँका मुदत ठेवींवर किती व्याज देतात?
1. कोटक महिंद्रा बँक
कोटक महिंद्रा बँकेकडून सामान्य नागरिकांसाठी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर 2.75 टक्के ते 7.20 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. 390 दिवस, 391 दिवस, 23 महिन्यांपेक्षा कमी, 23 महिने आणि 23 महिने, 1 दिवस आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर सर्वात जास्त 7.20 टक्के दर दिला जात आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, 11 मे 2023 पासून व्याजदर लागू केले आहेत.
2. एचडीएफसी बँक
देशातील सगळ्यात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक आपल्या मुदत ठेवींवर तीन टक्के ते 7.25 टक्के व्याज देतअसून ही बँक 4 वर्षे, 7 महिने ते 10 वर्षांच्या मुदत ठेवींवर जास्तीत जास्त 7.25 टक्के दराने व्याज देत आहे. या बँकेच्या वेबसाइटनुसार, हे व्याजदर 29 मे 2023 पासून दोन कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर करण्यात आले आहे.
3. आयसीआयसीआय बँक
ही बँकेकडून सामान्य नागरिकांसाठी सात दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर तीन टक्के ते 7.10 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. 15 महिने आणि 18 महिन्यांपेक्षा कमी तसेच 18 महिने ते दोन वर्षांच्या ठेवींवर सर्वात जास्त 7.10 टक्के दर दिले जात आहे. या बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 24 फेब्रुवारी 2023 पासून लागू केले आहेत.
मागील आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीकडून रेपो दरात सतत वाढ करण्यात आली होती. त्यामुळे बँकांनी त्यांच्या मुदत ठेव योजनांचे व्याजदरही वाढवले आहेत.