Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांमध्ये करा एक लाखाची एफडी, बघा तीन वर्षात किती होईल फायदा !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit Interest Rate : सध्या एफडी करण्याचा विचार असेल तर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर मजबूत परतावा ऑफर करत आहे. येथे तीन वर्षाची गुंतवणूक करून तुम्ही बक्कळ परतावा कमावू शकता. कोणत्या बँका किती व्याजदर ऑफर करत आहेत, चला पाहूया…

-बँक ऑफ बडोदा तीन वर्षांच्या FD वर 7.75 टक्के व्याजदर देते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, ही ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याजदर देत आहे. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.26 लाख रुपये होईल.

-Axis Bank ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याजदर देते. तुमची आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

-HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याजदर देतात. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

-कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देते. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

-स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देते. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.24 लाख रुपये होईल.

-बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक ऑफ इंडिया तीन वर्षांच्या एफडीवर 7 टक्के व्याजदर देतात. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.23 लाख रुपये होईल.

-इंडियन बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ६.७५ टक्के व्याज देते. आता गुंतवलेली 1 लाख रुपयांची रक्कम तीन वर्षांत वाढून 1.22 लाख रुपये होईल.