Fixed Deposit Interest Rate : आजच्या काळात सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणजे एफडी. FD केवळ सुरक्षा प्रदान करत नाही तर, तुम्हाला यावर भरघोस व्याज देखील मिळतो. देशात अशा अनेक बँका आहेत ज्या आपल्या एफडीवर चांगला परतावा ऑफर करत आहेत. मागील वर्षात रेपो दारात झपाट्याने वाढ झाली असून, बँकांनी देखील आपल्या एफडी व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.
मुदत ठेव योजनेंतर्गत, तुम्ही खाते उघडल्यावर पैसे एकदाच जमा करू शकता. तसेच बँकेनुसार व्याजदर देखील वेगवेगळे असतात. हे तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा देण्यास मदत करते. एफडीचा कालावधी 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत असतो. आज आम्ही तुम्हाला देशातील तीन मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या एफडी दरांबद्दल सांगत आहोत. जेणेकरून तुम्हाला स्वतःसाठी एक चांगली गुंतवणूक योजना मिळू शकेल.
बँक ऑफ बडोदा एफडी
देशातील सर्वात मोठी सरकारी क्षेत्रातील बँक, बँक ऑफ बडोदा 1 वर्षाच्या एफडीवर 7.25 टक्के व्याज, 5 वर्षांच्या कालावधीवर 7.25 टक्के आणि 3 वर्षांच्या एफडीवर 6.75 टक्के व्याज देत आहे.
बँक ऑफ इंडिया एफडी
बँक ऑफ इंडिया आपल्या एफडीवर सर्वाधिक ७.२५ टक्के व्याज देत आहे. बँक एका वर्षासाठी 6.50 टक्के, दोन वर्षांसाठी 6.50 टक्के आणि पाच वर्षांच्या एफडीवर 6 टक्के व्याज देत आहे. लक्षात घ्या जेष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याज मिळतात.
स्टेट बँक ऑफ इंडिया एफडी
स्टेट बँक ऑफ इंडिया सर्वाधिक ७.१ टक्के व्याज देत आहे. बँक एका वर्षाच्या एफडीवर ६.८ टक्के, दोन वर्षांच्या एफडीवर ६.५ टक्के आणि ५ वर्षांच्या मुदत ठेवीवर ६.५ टक्के व्याज देत आहे.