Fixed Deposit : SBI ने आणली जबरदस्त योजना ! सुरक्षित गुंतवणुकीसह उत्तम परतावा, जाणून घ्या कोणती?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI Green Rupee Fixed Deposit : एसबीआय ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, जी ग्राहकांना एका-पेक्षा एक सुविधा पुरवते. तसेच एसबीआय वेळोवेळी गुंतवणुकीच्या नवनवीन योजना देखील आणत असते, जिथे गुंतवणूक करून ग्राहक त्यांचे पैसे डबल करू शकतील. आज आपण एसबीआयची अशीच एक योजना जाणून घेणार आहोत, जिथे ग्राहकांना गुंतवणुकीवर बक्कळ परतावा मिळत आहे.

एसबीआयच्या उत्तम योजनांपैकी एक ग्रीन रुपी मुदत ठेव योजना ही देखील अशीच एक योजना आहे. जी ग्राहकांना उत्तम परतावा ऑफर करते. स्टेट बँक ऑफ इंडियाने नुकतीच ही योजना सुरु केली आहे जी भारताच्या ग्रीन फायनान्स इकोसिस्टमला चालना देईल.

बँकेने असा गुंतवणूक फंड सुरू केला आहे ज्याद्वारे लोक गुंतवणूक करू शकतात आणि बंपर उत्पन्न मिळवू शकतात. बँकेचे म्हणणे आहे की, या विशेष फंडात गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.१५% पर्यंत व्याज मिळेल. SBI, बँकिंग क्षेत्रातील आघाडीची बँक, पर्यावरण संरक्षित प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी एक अनोखी ऑफर देते. बँकेने असा गुंतवणूक निधी सुरू केला आहे ज्यामध्ये भारतीय नागरिक आणि NRI ग्राहकही गुंतवणूक करू शकतात.

SBI ग्रीन रुपी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदर

या ग्रीन डिपॉझिट स्कीमवर, SBI, 1111 दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 6.65% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.15% व्याजदर देत आहे. तर 1777 दिवसांच्या मुदत ठेवींवर, सामान्य नागरिकांना 6.65% व्याज दर मिळत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 7.15% व्याजदर मिळत आहे. याशिवाय 2222 दिवसांच्या दीर्घ मुदतीच्या मुदत ठेवींवर सर्वसामान्य नागरिकांना 6.40 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.40 टक्के व्याजदर मिळत आहे.

फायदे :-

एसबीआयने सुरु केलेला हा फंड भविष्यात उत्तम परतावा देईल. हा निधी पर्यावरण संरक्षण प्रकल्पांमध्ये वापरला जातो. त्यामुळे अधिक गुंतवणूकदार ग्रीन डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान देतात. ग्रीन डिपॉझिटवरील व्याजदर सामान्यतः इतर मुदत ठेवींपेक्षा जास्त असतात. येथे लोक सुरक्षित पैसे आणि प्रचंड परताव्याची अपेक्षा करू शकतात.

एसबीआय ग्रीन ररुपी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

SBI च्या या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी सध्या तुम्हाला बँकेच्या शाखेत जावे लागेल, बँकेचे म्हणणे आहे की लवकरच ही सुविधा ‘YONO App’ आणि ऑनलाइन बँकिंग सारख्या डिजिटल माध्यमांवर देखील उपलब्ध होईल.