Fixed Deposit : एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय?; ‘या’ 3 सरकारी बँका देत आहेत सर्वाधिक व्याज; बघा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Fixed Deposit : दिवाळीच्या दिवसांत तुम्ही देखील तुमचे पैसे एफडीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील काही खास सरकारी बँकांच्या FD बद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला फक्त एका वर्षातच बंपर रिटर्न्स मिळतात.

गुंतवणूक सुरू करण्यासाठी दिवाळी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही पैसे वाचवण्याचा विचार करत असाल तर FD हा एक चांगला पर्याय आहे. दिवाळीच्या या शुभमुहूर्तावर काही सरकारी बँकांनी त्यांच्या ग्राहकांसाठी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. तुम्ही या बँकांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करून काही दिवसांतच मालामाल होऊ शकता.

पंजाब नॅशनल बँक FD

पंजाब नॅशनल बँक आपल्या ग्राहकांना 1 वर्षाची FD सुविधा देत आहे. PNB सामान्य ग्राहकांना एक वर्षाच्या मुदत ठेवींवर 6.75 टक्के दराने व्याज देत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्के दराने व्याज मिळत आहे. पीएनबीने नुकतेच १ नोव्हेंबर रोजी व्याजदरात वाढ केली आहे.

बँक ऑफ बडोदा FD

जर तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये एफडी केली तर आता तुम्हाला बँकेकडून जास्त व्याज मिळत आहे. बँकेने सणासुदीच्या काळात व्याजदरात वाढ केली आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर, सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 6.75 टक्के दराने व्याज मिळत आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना ७.२५ टक्के दराने व्याज मिळत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया FD

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेबद्दल बोलायचे झाल्यास, SBI आपल्या ग्राहकांना 3 टक्के ते 7.10 टक्के व्याज लाभ देत आहे. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींसाठी हे दर आहेत. याशिवाय, तुम्ही SBI मध्ये एका वर्षासाठी मुदत ठेव ठेवल्यास, तुम्हाला 5.75 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना ६.२५ टक्के दराने व्याज मिळणार आहे.