Floriculture Farming:- शेती क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून विस्तारत देखील आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विविध पिक पद्धती यांची सांगड घालून शेतकरी आता व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर शेती करू लागले असून अनेक तरुण आता शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येत आहेत. व्यावसायिक दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या विदेशी आणि देशी भाजीपाल्यांची लागवड तसेच शेडनेट सारख्या तंत्रज्ञानाच्या साह्याने संरक्षित शेती,
विविध प्रकारच्या फळबागांची लागवड आणि शेडनेट आणि मोकळ्या शेतीमध्ये फुलशेती देखील आता मोठ्या प्रमाणावर करू लागले असून भाजीपाला आणि फुलशेतीमधून दिवसाला हातात पैसे येत असल्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून देखील समृद्ध होताना दिसून येत आहेत. यामध्ये फुलेशेती ही शेडनेट सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात येत असून अनेक प्रकारची फुल लागवड आणि त्यांच्या उत्पादनातून शेतकरी लाखोत नफा कमवत आहेत. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण हरियाणा राज्यातील सोनीपत या परिसरातील बैयापूर या गावचे शेतकरी राजेश यांचा विचार केला
तर त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे. परंपरागत शेतीमध्ये परवडत नसल्यामुळे या शेतीचा नाद सोडून दहा वर्षांपूर्वी त्यांनी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला व यातून त्यांनी गुलाबाची लागवड करायला सुरुवात केली. लागवडीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळायला लागल्यानंतर त्यांनी गुलाबाला जोड म्हणून झेंडू फुल पिकाची लागवड केली व झेंडूचे देखील उत्पादन ते चांगल्या प्रकारे घेऊ लागले आहेत.
आज या दोन्ही फुलांच्या विक्रीतून त्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे व त्यांची वार्षिक कमाई पहिली तर ती लाखो रुपयांमध्ये आहे. या फुलशेती बद्दल माहिती देताना राजेश म्हणतात की, फुल शेतीमध्ये सुरुवातीला खूप प्रकारच्या अडचणी आल्या. परंतु व्यवस्थित माहिती घेऊन या अडचणीवर मात केली व आज या फुलांच्या विक्रीतून दररोज पैसे हाती येतात व वार्षिक उत्पन्न लाखोंच्या आसपास मिळते.
जर त्यांनी फुल लागवडीचा घेतलेल्या निर्णयाची पार्श्वभूमी पाहिली तर एकदा बाजारपेठेमध्ये शेतीमाल विकायला गेल्या नंतर त्यांना एका व्यापाऱ्याने फूलशेतीबद्दल माहिती दिली व बाजारात त्याचे किती महत्त्व आहे हे त्यांनी पटवून दिले. याच गोष्टीतून त्यांनी प्रोत्साहन घेतले व गुलाबाचे उत्पादन घ्यायला सुरुवात केली व मागील दोन वर्षांपासून ते झेंडूची लागवड देखील करत आहेत.
प्रति एकर मिळाला तीन ते चार लाख रुपयांचा नफा
राजेश यांनी फुलशेतीच्या माध्यमातून एका एकरातून स्वतःला तीन ते चार लाख रुपयांचा नफा मिळवला असून ते आता त्या दृष्टिकोनातून इतर शेतकऱ्यांनी देखील फुलशेतीकडे वळावे असे सांगतात. त्यामुळे आता त्यांच्या परिसरातील अनेक शेतकरी आता फुल शेतीबद्दल प्रशिक्षण आणि माहिती घेण्यासाठी राजेश यांच्याकडे येत आहेत.
अशा पद्धतीने परंपरागत शेती पद्धत आणि पिकांची लागवड सोडून जर आधुनिक शेतीचा ध्यास घेतला तर कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखात उत्पन्न मिळू शकते हे राजेश यांच्या उदाहरणावरून दिसून येते.