आर्थिक

Fixed Deposit : जेष्ठ नागरिकांची मजाच मजा! ‘ही’ बँक देतेय भरघोस परतावा, आताच करा गुंतवणूक…

Published by
Ahmednagarlive24 Office

Fixed Deposit : भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील HDFC बँक आपल्या करोडो ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एक विशेष एफडी ऑफर करते. त्यावर बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांऐवजी 0.25 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. पण या संधीचा लाभ ज्येष्ठ नागरिक 10 मे पर्यंतच घेऊ शकतात. कारण HDFC बँकेने 2020 पासून सुरु केलेली सीनियर सिटीजन केयर एफडी आता बंद करणार आहे. अशातच जर तुम्हाला या एफडीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे खूपच कमी दिवस शिल्लक आहेत.

एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना सीनियर सिटीझन केअर एफडीवर 0.50 टक्क्यांऐवजी 0.25 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.75 टक्के अतिरिक्त व्याज देते. हे  नियमित FD पेक्षा थोडे अधिक आहे.

5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना बँक 7.75 टक्के पर्यंत व्याज देत आहे. हे व्याज 5 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर मिळते. एचडीएफसी बँक सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 3.50 ते 7.75 टक्के व्याज देत आहे. HDFC बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर सामान्य आणि जेष्ठ नागरिकांना किती व्याज ऑफर करतते आहे पुढील प्रमाणे :-

7 दिवस ते 14 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

15 दिवस ते 29 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 3.50 टक्के

30 दिवस ते 45 दिवस: सामान्य लोकांसाठी – 3.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 4.00 टक्के

46 दिवस ते 60 दिवस: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

61 दिवस ते 89 दिवस: सर्वसामान्यांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

90 दिवस ते 6 महिने: सामान्य लोकांसाठी – 4.50 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 5.00 टक्के

6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 5.75 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.25 टक्के

9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 6.50 टक्के

1 वर्ष ते 15 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 6.60 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.10 टक्के

15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.10 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

18 महिने 1 दिवस ते 21 महिन्यांपेक्षा कमी: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

21 महिने ते 2 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

2 वर्षे 1 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी 11 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

2 वर्षे 11 महिने ते 35 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

2 वर्षे 11 महिने 1 दिवस ते 4 वर्षे 7 महिने: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

4 वर्षे 7 महिने 1 दिवस 5 वर्षांपेक्षा कमी किंवा समान: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.50 टक्के

5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे: सामान्य लोकांसाठी – 7.00 टक्के; ज्येष्ठ नागरिकांसाठी – 7.75 टक्के.

Ahmednagarlive24 Office