आर्थिक

Sarkari Yojana: फुकट मिळवा स्प्रिंकलर सेट, शिलाई आणि झेरॉक्स मशीन! सरकार देत आहे 100 टक्के अनुदान

Published by
Ajay Patil

Sarkari Yojana:- समाजातील विविध घटकांच्या विकासाकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. अशा योजनांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटक व इतरांना आर्थिक किंवा अनुदान स्वरूपामध्ये मदत देऊन व्यवसाय उभारणीकरिता प्रोत्साहन दिले जाते.

अशा प्रकारच्या योजना केंद्र सरकारच्या माध्यमातूनच नव्हे तर राज्य सरकारचे जिल्हा परिषद मार्फत देखील राबवले जातात. जर आपण जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा विचार केला तर या विभागाच्या माध्यमातून अनेक लाभाच्या योजना राबवल्या जात आहेत.

याच मुद्द्याला धरून जर आपण 20 टक्के उपकरातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा विचार केला तर त्यांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने सहा दिवसांपूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली आहे व आता  या योजनांसाठी जे लाभार्थी पात्र असतील अशा पात्र लाभार्थ्यांची निवड यादी अंतिम करण्याचे काम आता वेगात सुरू आहे.

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून समाजातील मागासवर्गीय कुटुंबाचा जो काही आर्थिक स्थर आहे तो उंचावण्याकरिता उपकरातून शंभर टक्के अनुदानावर आत्ताच स्प्रिंकलर संच, झेरॉक्स आणि शिलाई मशीन देण्यासाठीच्या स्वयंरोजगारावर आधारित 100% अनुदानाच्या योजना राबवण्यात येत आहेत.

या योजनेसाठी जे अर्ज प्राप्त होतील त्यांची छाननी पंचायत समिती स्तरावर करून त्या योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या. या योजने करता लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून लाभार्थ्यांनी संबंधित वस्तू बाजारातून खरेदी करायचे आहे.

त्यानंतर त्या वस्तूंची खातरजमा ग्रामसेवकाच्या माध्यमातून केली जाईल व त्या वस्तूची पावती पंचायत समितीकडे सादर करावी लागेल. ही प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित वस्तूची रक्कम आरटीजीएस मार्फत संबंधित लाभार्थ्याच्या खात्यावर थेट जमा केली जाणार आहे.

 स्प्रिंकलर करिता मिळणार शंभर टक्के अनुदान

मागासवर्गीय प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना स्प्रिंकलर सेट खरेदी करायचा असेल तर त्याकरिता शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झालेल्या 136 शेतकऱ्यांना प्रत्येकी 31 हजार 900 रुपये दिले जाणार आहेत.

 झेरॉक्स मशीनसाठी मिळणार 100% अनुदान

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून पुरुष आणि महिलांना जर झेरॉक्स मशीनचा व्यवसाय करायचा असेल तर त्यांना देखील या मशीन करिता शंभर टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यावर्षी 169 पुरुष आणि 185 महिलांना प्रत्येकी 43 हजार 70 रुपये प्रत्येकी खात्यात जमा केले जाणार आहेत.

 शिलाई मशीन करता मिळणार 100% अनुदान

समाजातील गरजू महिलांना शिलाई कामाचा अनुभव आहे व त्यांनी यासंबंधीचा व्यवसाय ते करत आहेत अशा 145 महिलांना शिलाई मशीन खरेदी केल्यानंतर प्रत्येकी नऊ हजार तीनशे रुपये दिले जाणार आहेत.

 या योजनेसाठीची पात्रता काय?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हे अनुसूचित जाती/जमाती, विभक्त भटके,  विमुक्त जातीतील असणे गरजेचे आहे व हे लाभार्थ्या अल्प उत्पन्न गटातील असावेत.

 कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता भासेल?

या योजनांचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, दारिद्र्य रेषेखालील असतील तर त्यासंबंधीचा दाखला, स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावरील जागा असेल तर त्याचा दाखला इत्यादी  कागदपत्रांची आवश्यकता भासेल.

Ajay Patil