Categories: आर्थिक

अवघ्या 25 हजारांत मिळवा हीरो पॅशन प्रो

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- जर आपण हिरोची बाईक घेण्याचा विचार करत असाल तर पॅशन प्रो हा एक चांगला पर्याय असू शकतो. नवीन पॅशन प्रो ची किंमत जरी सुमारे 70 हजार रुपये असली परंतु आम्ही आपल्याला 25 हजारांच्या रेंजमध्ये मिळणाऱ्या जुन्या पॅशन प्रो बाईकबद्दल सांगणार आहोत.

वास्तविक,सेकंड-हँड बाईक आणि कार विकारणाऱ्या ड्रूम या ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवर सेकंड हॅन्ड पॅशन प्रो 100 सीसी बाईक 25 हजार रुपयांना मिळेल. ही बाईक फर्स्ट ओनरकडून विकली जात आहे.

या बाईकने 22 हजार किलोमीटरहून अधिक अंतर चालवले आहे. या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ही बाइक 100 सीसी इंजिनसह खरेदी करू शकता.

येथे तुम्हाला रिफंडेबल टोकन रक्कम या डिलसाठी जमा करावी लागेल. नवीन पॅशन प्रो बाईक बद्दल बोलायचे झाले तर त्यात बरेच अद्ययावत फीचर्स आहेत आणि त्याची एक्स-शोरूम किंमत 67-70 हजार रुपयांदरम्यान आहे.

हीरो मोटोकॉर्पचा नफा वाढला: डिसेंबर 2020 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी दुचाकी वाहन कंपनी हीरो मोटोकॉर्पचा शुद्ध लाभ 13.7 टक्क्यांनी वाढून 1,029.17 कोटी झाला आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कंपनीला निव्वळ नफा 905.13 कोटी होता. हीरो मोटोकॉर्पने सांगितले की उत्पन्न वाढून 9,827.05 कोटी रुपये झाले, कि जे 2019-20 च्या तिसर्‍या तिमाहीत 7,074.86 कोटी रुपये होते. कंपनीने 21 जानेवारी 2021 रोजी 10 करोड़ दुचाकी वाहन उत्पादनाचा टप्पा ओलांडला.

अहमदनगर लाईव्ह 24