Car Insurance Tricks:- जेव्हाही आपण बाईक्स किंवा कार इत्यादी नवीन वाहन घेतो व त्याकरिता आपण विमा घेत असतो. कारण वाहनांसाठी विमा खूप महत्त्वाचा असतो. रस्त्यावर जाताना कधी वाहनाचे काय नुकसान होईल हे आपण सांगू शकत नाही व त्या दृष्टिकोनातून जर नुकसान झाले तर मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते व या मधून वाचण्याकरिता विमा खूप फायद्याचा असतो.
त्यामुळे तुम्हाला देखील नवी कार घ्यायचे असेल व तिच्या करिता विमा उतरवायचा असेल तर तुम्ही एक ट्रिक वापरून नव्या कार साठी घेत असलेल्या विम्यात तब्बल 50% पर्यंत बचत करू शकतात.जर तुमच्याकडे जुनी कार असेल व या जुन्या कारच्या विम्याचा नो क्लेम बोनस असेल तर तुम्ही हा बोनस नव्या कारमध्ये ट्रान्सफर करून ही बचत करू शकतात.
जुन्या कारच्या विम्याचा नो क्लेम बोनस नव्या कारमध्ये ट्रान्सफर करा व नवीन कार विम्यात 50% पर्यंत बचत करा
आपल्याकडे जुनी कार असते व ही जुनी कार नो क्लेम बोनसमध्ये वर्ग करून नव्या गाडीचा विम्यामध्ये तुम्ही मोठी बचत करू शकतात. परंतु या प्रकारे लाभ घेण्यासाठी त्यामध्ये एक अट आहे व ती म्हणजे विमाधारकाने आधीच्या वर्षात कुठलाही क्लेम केलेला नसेल तरच नो क्लेम बोनसचा लाभ विमाधारकाला त्यामध्ये घेता येणे शक्य आहे.
सुरुवातीला आपल्या डॅमेज विम्यावर नो क्लेम बोनस 0% असतो व तुम्ही अशा प्रसंगी कुठलाही क्लेम फाईल केला नसेल तर दरवर्षी वीस ते पंचवीस टक्क्यांनी नो क्लेम बोनसमध्ये वाढ होते. समजा तुम्ही जर पहिल्या वर्षी क्लेम केला नाही तर वीस टक्के नो क्लेम बोनस तुम्हाला मिळतो.
दुसऱ्या वर्षी देखील घेतला नाही तर त्यामध्ये वाढ होऊन तो 25% पर्यंत तुम्हाला मिळतो. तिसऱ्या वर्षी देखील तुम्ही घेतला नाही तर त्यामध्ये 35% आणि चौथ्या वर्षी वाढ होऊन 45 व पाच वर्ष 50% पर्यंत नो क्लेम बोनसमध्ये वाढ होते.
नो क्लेम बोनसला नव्या इन्शुरन्स पॉलिसीत करा ट्रान्सफर
नो क्लेम बोनस हे वाहनाशीच नाहीतर पॉलिसी धारकाशी देखील संबंधित असतात. म्हणजेच तुम्ही जुन्या वाहनाचा नो क्लेम बोनस कोणत्याही नव्या वाहनावर ट्रान्सफर करू शकतात.मग ते वाहन कुठल्याही ब्रँडचे देखील असेल तरी चालते.
फक्त अशाप्रकारे नो क्लेम बोनस ट्रान्सफर करताना ते वाहन एकसारख्या प्रकारातील असावे. म्हणजेच कार असेल तर कार आणि बाईक ते बाईक असाच नो क्लेम बोनस ट्रान्सफर करता येतो व विशेष म्हणजे यामध्ये गाडीचा मालक देखील बदललेला चालत नाही.
तुम्ही अशा प्रकारे करू शकतात पैशांची बचत
त्यामध्ये समजा तुमच्या विम्याचा हप्ता जर 35 हजार 500 रुपयांचा असेल आणि तुम्हाला नो क्लेम बोनस जर 20% मिळाला तर तुम्हाला नंतरचा विम्याचा हप्ता 28 हजार 400 रुपये इतका भरावा लागतो.
जर तुमचा नो क्लेम बोनस डिस्काउंट 25% असेल तर तुम्हाला तिसऱ्या वर्षी 35 हजार पाचशे ऐवजी 26 हजार 625 रुपये इतकाच विमा हप्ता भरावा लागतो. समजा पाचव्या वर्षी तुम्हाला नो क्लेम बोनस 50 टक्के मिळाला तर तुम्हाला पस्तीस हजार पाचशे ऐवजी 17750 रुपये इतका विमा हप्ता भरावा लागतो.