Categories: आर्थिक

Pension Scheme : सरकारच्या ‘या’ योजनेत महिन्याला भरा 55 रुपये अन् मिळवा ‘इतकी’ पेन्शन !

Published by
Ahmednagarlive24 Office

Pension Scheme : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये पीएम किसान योजना, पीएम जन धन योजना, पीएम श्रम योगी योजना इत्यादी राबवल्या जात आहेत. यातच पीएम किसान मानधन योजनेचाही समावेश आहे.

या सरकारी योजनेत वयाच्या 60 वर्षापर्यंत 55 ते 200 रुपये मासिक हप्ते भरून दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळते. ही योजना कशी काम करते? आणि कोण याचा लाभ घेऊ शकतो, पाहूया…

सरकार 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी ही पेन्शन योजना चालवत आहे. या योजनेत उमेदवाराला मासिक पेन्शन मिळते. यामध्ये वयाच्या 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना दरमहा 3 हजार रुपये म्हणजे 36 हजार रुपये वार्षिक पेन्शन मिळते.

या योजनेत18 ते 40 वयोगटातील शेतकरी नोंदणी करू शकतात. वयानुसार, शेतकऱ्यांना 60 वर्षांसाठी 55 ते 200 रुपये मासिक हप्ते जमा करावा लागतो. शेतकरी वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांचे हप्ते बंद होतात. त्यानंतर त्यांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळतो.

या पेन्शनसाठी कसा अर्ज करायचा?

यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल. त्याचबरोबर जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रांसह बँक खाते आणि आधारकार्डच्या प्रतीसह अर्ज करावा लागेल. यानंतर, मिळालेला पेन्शन योजनेचा नोंदणी क्रमांक तुमच्या आधार कार्डशी लिंक करावा लागेल.

यानंतर तुम्हाला पेन्शन नंबर आणि पेन्शन कार्ड मिळेल. या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही 1800-267-6888 वर कॉल करू शकता. यासोबतच तुम्ही अधिकृत वेबसाईट maandhan.in वर देखील ऑनलाइन अर्ज करू शकता.

पेन्शन कोणाला मिळते?

या योजनेअंतर्गत, एक मजूर ज्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपर्यंत आहे. त्याला 3 हजार रुपये पेन्शनही मिळू शकते.

तसेच ज्या व्यापाऱ्यांची वार्षिक उलाढाल 1.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त नाही त्यांनाही 3,000 रुपये पेन्शन मिळू शकते.

Ahmednagarlive24 Office