7th Pay Commission:- सध्या मार्च महिना सुरू असून हा मार्च महिना आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असतो. कारण या महिन्याच्या शेवटच्या तारखेला आर्थिक वर्ष संपत असते व एक एप्रिल पासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होत असते. त्यामुळे अनेक आर्थिक बाबींमध्ये किंवा आर्थिक गोष्टींमध्ये सरकारच्या माध्यमातून बदल केले जातात
किंवा काही नियमांमध्ये सुधारणा केली जातात. अगदी याच पद्धतीने या महिन्यातील 30 मार्च ही तारीख देशातील जवळपास 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांसाठी खूप महत्त्वाची आहे.कारण तीस मार्च या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार होण्याची शक्यता असून
या मार्च महिन्याच्या पगारामध्ये सरकारच्या माध्यमातून जी काही महागाई भत्त्यात आणि घरभाडे भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे तो देखील मिळणार आहे.
कारण मार्च महिना 31 तारखेचा जरी असला तरी त्या दिवशी रविवार येत असल्यामुळे तीस मार्च या दिवशी पगार होण्याची अपेक्षा आहे. या पगारामध्ये महागाई भत्ता आणि घरभाडे भत्तावाढीचा लाभ देखील समाविष्ट असणार आहे.
केंद्र सरकारने नुकतीच केली महागाई भत्त्यात वाढ
सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली असून यानुसार आता अगोदर असलेला 46% इतका महागाई भत्ता चार टक्क्याने वाढून 50 टक्के झाला आहे. महत्वाचे म्हणजे महागाई भत्त्यातील ही वाढ गेल्या जानेवारी महिन्यापासून लागू होणार आहे.
तसेच घरभाडे भत्त्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर जेव्हा महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा घर भाडेभत्ता देखील वाढतो व हा भत्ता शहरांच्या वर्गीकरणानुसार कर्मचाऱ्यांना दिला जातो व तो 30 टक्के पर्यंत मिळतो. महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मिळणारा घरभाडे भत्ताच नाही तर चाइल्ड केअर तसेच चाइल्ड एज्युकेशन यासारख्या इतर
भत्त्यांमध्ये देखील वाढ झाली आहे. परंतु या भत्त्यांचा लाभ घेण्यासाठी मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याकरिता दावा करावा लागतो. या अनुषंगाने केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता देशातील 48 लाख केंद्रीय कर्मचारी व 68 लाख पेन्शन धारक यांना मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आहे.