Umang App : ‘या’ अँपद्वारे मिळवा अडकलेलं PF चे पैसे, असा करा अर्ज, जाणून घ्या..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Umang App : आपण जिथे काम करतो तिथे आपला पीएफ आपल्या खात्यात जमा केला जातो. आपल्या PF चे हे पैसे अनेकदा अडचणींमध्ये आपल्याला उपयोगी पडतात. मात्र आता आपल्या PF चे हे पैसे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही काढू शकता. उमंग अँपच्या मदतीने तुम्ही हे पैसे सहज काढू शकता. कसे ते जाणून घ्या..

ईपीएफओच्या नियमांनुसार, तुमच्या नोकरीची वर्षे आणि तुम्ही दिलेल्या कारणानुसार तुम्हाला हा PF मिळू शकतो. यावरती तुम्ही तुमच्या खात्यामधून किती रक्कम काढू शकता हे ठरवले जाते.

उमंग अॅपद्वारे पैसे कसे काढायचे

PF मधून पैसे काढण्याचे अनेक मार्ग असले तरी सरकारच्या उमंग अॅपच्या मदतीने तुम्ही पीएफ निधीचा दावा अगदी सहज करू शकता. दरम्यान, यामुळे तुमच्या PF चे पैसे अगदी 3 ते 5 दिवसांत खात्यात ट्रान्सफर केले जातात.

दरम्यान, यासाठी ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर तुमच्या आधारशी जोडला असलेला पाहिजे. आणि, यासाठी तुमचे वय 54 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

या अँपद्वारे पैसे काढण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर द्यावा लागेल. यानंतर अॅपमध्ये लॉग इन करा. तुम्हाला स्क्रीनवर अनेक पर्यायांमध्ये EPFO ​​देखील दिसेल. त्यावर क्लिक करा आणि राइज क्लेम निवडा. OTP जनरेट करण्यासाठी UAN निवडा. यानंतर मोबाईलवर OTP टाका. आता पैसे काढण्याचा प्रकार निवडा आणि फॉर्म भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर, तुम्हाला रेफरेंस नंबर असलेली स्लिप मिळेल.

जर तुम्ही घर बांधण्यासाठी, खरेदी करण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी पीएफमधून पैसे काढत असाल तर तुम्हाला किमान 60 महिने सेवा पूर्ण करावी लागेल. दरम्यान, तेव्हा तुम्ही 36 महिन्यांचा पगार आणि DA एवढी रक्कम काढू शकता.

इतर कामांसाठी किती रक्कम काढता येईल?

दरम्यान, तुमची मुलगी, मुलगा, भाऊ किंवा बहिणीच्या दहावीच्या शिक्षणासाठी झालेला खर्च सांगून तुम्ही पीएफमधून 50 टक्के रक्कम काढू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या निवृत्तीच्या एक वर्ष आधी तुमच्या रकमेच्या 90 टक्के रक्कम काढू शकता.