आर्थिक

Car Loan: सणासुदीला घ्या तुमच्या स्वप्नातील कार! ‘या’ बँका देत आहेत स्वस्त व्याजदरावर कार लोन, वाचा किती भरावा लागेल ईएमआय?

Published by
Ajay Patil

Car Loan:- गणेश उत्सव संपला आणि आता नवरात्रीचे वेध लागले असून त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये दसरा आणि दिवाळी सारखे भारतातील सगळ्यात मोठे सण येणारे आहेत. या कालावधीमध्ये बरेच जण नवनवीन सुरुवात करतात व बरेच जण अशा सणासुदीच्या कालावधीमध्ये शुभमुहूर्तावर वाहने देखील विकत घेतात. यामध्ये कार आणि बाईक घेणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असते.

अगदी तुम्हाला देखील या सणासुदीच्या कालावधीमध्ये कार विकत घ्यायची असेल तर तुम्ही ती आता सहज रीतीने घेऊ शकतात. कारण आता बँकांच्या माध्यमातून देखील कार लोन सहजपणे उपलब्ध करून दिले जाते. परंतु जेव्हा कार लोन आपण घेतो तेव्हा त्या कार लोनवर आकारण्यात येणारे व्याजदर याचा अभ्यास करणे खूप गरजेचे असते.

कारण व्याजदराचा मोठा परिणाम हा आपल्या कर्ज परतफेडीवर होत असल्यामुळे कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहेत ते आपल्याला नेमकेपणाने माहीत असणे गरजेचे आहे. तुम्हाला देखील या कालावधीत कारलोन घेऊन कार घ्यायची असेल तर आपण काही बँकांची माहिती घेणार आहोत जे स्वस्त व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देतात.

 पाच वर्षासाठी पाच लाख रुपयांचे कार लोन घेतल्यावर किती हप्ता भरावा लागेल?

1- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया कडून जर तुम्ही पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी कार लोन घेतले तर यावर बँकेकडून सरासरी 10.10 टक्क्यांनी व्याजदर आकारला जातो व याकरिता तुम्हाला साडेतीन हजार ते आठ हजार रुपये पर्यंत प्रक्रिया शुल्क भरावे लागते.

यामध्ये पाच वर्षासाठी पाच लाख रुपये कार लोन घेतल्यानंतर तुम्हाला महिन्याला दहा हजार 648 रुपये मासिक हप्ता भरावा लागतो व या पाच वर्षाच्या कालावधीत तुम्ही एकूण एक लाख 38 हजार 888 रुपये व्याज भरतात.

2- एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून जर तुम्ही पाच वर्षांकरिता पाच लाख रुपये कार लोन घेतले तर बँकेच्या माध्यमातून सरासरी 9.20% व्याजदरा आकरण्यात आला. एचडीएफसी बँकेच्या माध्यमातून कार लोन वर कुठल्याही प्रकारचे प्रक्रिया शुल्क लागत नाही.

पाच लाख रुपये पाच वर्षाकरिता कार लोन घेतल्यानंतर तुम्हाला  मासिक हप्ता दहा हजार 428 रुपये भरावा लागतो व पाच वर्षात तुम्हाला एकूण व्याज एक लाख 25 हजार 667 रुपये इतके द्यावे लागते.

 कार लोन घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1- खात्याचे संपूर्ण स्टेटमेंट म्हणजेच बँक खाते विवरण

2- दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

3- ओळखीचा पुरावा म्हणून(पासपोर्ट, पॅन कार्ड, मतदार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी)

4- पत्याचा पुरावा म्हणून( रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, टेलिफोन बिल, इलेक्ट्रिसिटी बिल किंवा जीवन विमा पॉलिसी इत्यादी)

5- पगार स्लिप आणि फॉर्म 16

6- पगार नसलेल्या/ व्यावसायिक यांच्या बाबतीत लेखापरीक्षित ताळेबंद, दोन वर्षाचा नफा तोटा विवरण तसेच दुकान आणि आस्थापना प्रमाणपत्र/ विक्रीकर प्रमाणपत्र/ एसएसआय नोंदणीकृत प्रमाणपत्र/ भागीदारीची प्रत

7- शेती किंवा संबंधित कामात गुंतलेल्या लोकांच्या बाबतीत जमीन मालकीचा पुरावा तसेच सर्व जमीन फ्री होल्ड आधारावर असणे गरजेचे आहे आणि संबंधित जमिनीचा मालकीचा पुरावा कर्जदाराच्या नावावर असावा. सातबारा उतारा किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे लागतात.

 कोणत्या बँका आकारतात आणि कोणत्या बँका आकारत नाहीत प्रक्रिया शुल्क?

तसे पाहायला गेले तर बऱ्याच बँका कार लोनवर प्रक्रिया शुल्क आकारत असतात. परंतु काही बँका मात्र यावर असलेले प्रक्रिया शुल्क आकारत नाहीत. जर आपण  युको बँकेच्या दृष्टिकोनातून पाहिले तर ही बँका प्रक्रिया शुल्क आकारत नाहीत.

तर युनियन बँक ऑफ इंडिया सारख्या बँक 1000 रुपये, आयडीबीआय बँक 2500 रुपये आणि बँक ऑफ बडोदा, फेडरल बँक तसेच आयडीएफसी फर्स्ट बँक 2000 ते दहा हजार रुपये प्रक्रिया शुल्क आकारतात. तसंच कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया सारखे अनेक बँका कर्ज रकमेनुसार 1.25 टक्क्यांपर्यंत प्रक्रिया शुल्क आकारतात.

Ajay Patil