आर्थिक

Apply For Loan : स्वस्तात मिळत आहे 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज, बघा कुठे?

Published by
Ahmednagarlive24 Office

Apply For Personal Loan : केंद्र सरकार स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. विशेषत: तरुणांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

सरकारची अशीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री मुद्रा योजना, ज्यामध्ये केंद्र सरकार 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हमीशिवाय देत आहे, तसेच यावर व्याज देखील कमी आकारला जात आहे. या कर्जासाठी अर्ज करणेदेखील खूप सोपे आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत केंद्र सरकार ग्रामीण भागात बिगर कॉर्पोरेट लघुउद्योग सुरू करण्यासाठी किंवा विस्तार करण्यासाठी कर्ज देते. म्हणजेच, जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर या योजनेद्वारे तुम्हाला सहज कर्ज मिळेल.

पीएम मुद्रा योजनेंतर्गत उपलब्ध कर्जाची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये शिशु कर्ज, किशोर कर्ज आणि तरुण कर्जाचा समावेश आहे. मुद्रा योजनेला आठ वर्षे पूर्ण झाली असून, या योजनेअंतर्गत सरकारने 23.2 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

2015 मध्ये सुरू झालेल्या या योजनेच्या तीन श्रेणींवर नजर टाकली तर, शिशु कर्जाअंतर्गत 50 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते, तर किशोर कर्जाअंतर्गत 50 हजार ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तर, तरुण कर्जाअंतर्गत 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे.

पीएम शिशू मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही गॅरेंटरची आवश्यकता नाही किंवा त्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, वेगवेगळ्या बँकांमध्ये कर्जाच्या व्याजदरात तफावत असू शकते. हे बँकांवर अवलंबून आहे. या योजनेंतर्गत वार्षिक 9 ते 12 टक्के व्याजदर आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

पीएम मुद्रा कर्ज कर्जाची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे, यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेला भेट द्यावी लागेल. या सरकारी योजनेसाठी घरी बसूनही अर्ज करता येईल. अनेक बँकांनी अर्ज करण्याची ऑनलाइन सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तुम्ही https://www.mudra.org.in/ वर जाऊन अधिक माहिती मिळवू शकता.

पीएम मुद्रा योजनेअंतर्गत, लहान दुकानदार, फळे, अन्न प्रक्रिया युनिट्स यांसारखे छोटे उद्योग यांच्यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, निवासी पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, व्यवसाय प्रमाणपत्र आवश्यक आहे.

मुद्रा कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-

-व्यवसाय योजना
-अर्ज
-पासपोर्ट आकाराचा फोटो
-केवायसी कागदपत्रे
-ओळखीचा पुरावा
-वास्तव्याचा पुरावा
-उत्पन्नाचा पुरावा

उत्पादन, व्यापार किंवा सेवा क्षेत्रासारख्या बिगरशेती उत्पन्न देणाऱ्या क्रियाकलापांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची आवश्यकता असल्यास PMMY अंतर्गत MUDRA कर्ज मिळवण्यासाठी तो बँक किंवा NBFC शी संपर्क साधू शकतो.

Ahmednagarlive24 Office