Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे दर 56 हजार रुपये झाले आहेत. याशिवाय चांदीच्या दरातही घसरण होत आहे.
आज चांदीचा भाव 67,000 रुपयांच्या आसपास आहे. याशिवाय जागतिक बाजारात मोठी घसरण झाल्याने सोन्याचे दर सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत.
सोने सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचा भाव 1815 डॉलर प्रति औंस आणि चांदीचा भाव 1815 डॉलर प्रति औंस च्या खाली आला आहे. सोन्याची ही सात महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. कॉमेक्सवर चांदीचा भाव 21.19 डॉलर प्रति औंस आहे.
२२ कॅरेट सोन्याचे आजचे भाव
1 ग्रॅम – 5,275 रुपये
8 ग्रॅम – 42,200 रुपये
10 ग्रॅम – 52,750 रुपये
२४ कॅरेट सोन्याचे आजचे भाव
1 ग्रॅम – 5,753 रुपये
8 ग्रॅम – 46,024 रुपये
10 ग्रॅम – 57,530 रुपये