Gold Buying Rule: सणासुदीच्या कालावधी असो किंवा लग्नसराईचा कालावधी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याची परंपरा किंवा सोने खरेदी करण्याचा ट्रेंड आपल्याला पूर्वापारपासून भारतामध्ये दिसून येतो.
तसेच आता दिवाळी सारखा सण जवळ आल्यामुळे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजन सारख्या मुहूर्तावर सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते व मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून सोन्याच्या मागणीत वाढ होते.
या अनुषंगाने या दिवाळीच्या मुहूर्तावर तुम्हाला देखील सोन्याची खरेदी करायची असेल तर या बाबतीत काही महत्त्वाचे नियम तुम्हाला माहित असणे खूप गरजेचे आहे.
जेणेकरून तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय सोन्याची खरेदी आरामात करू शकता. सोने खरेदीमध्ये काही कायदेशीर नियम आहेत. जसे की तुम्ही कुठल्याही आयडी प्रूफ शिवाय किंवा पॅन कार्ड शिवाय किती सोने खरेदी करू शकतात? याबद्दल तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.
कॅशमध्ये सोने खरेदी करण्याची मर्यादा
जर आपण प्राप्तिकर कायदा 1961 चे कलम 279ST नुसार पाहिले तर एखादी व्यक्ती एका वेळेला कमाल दोन लाख रुपयांपर्यंतचे सोने रोख स्वरूपात म्हणजेच कॅशमध्ये खरेदी करू शकते.
यापेक्षा जास्त कॅशमध्ये पेमेंट करायचे असेल तर तुम्हाला पॅन किंवा आधार कार्ड देणे गरजेचे असते. इतकेच नाहीतर एखाद्या सोनाराने म्हणजेच ज्वेलरने ग्राहकाकडून दोन लाख रुपयापेक्षा जास्तीची कॅश घेतली तर दंड आकारला जाऊ शकतो व ही दंडाची रक्कम ग्राहकाकडून स्वीकारलेल्या रकमेइतकी देखील असू शकते.
आयकर नियमानुसार सोने खरेदी करिता पॅन आणि आधार कार्डची आवश्यकता
जर आपण आयकर नियम बघितला तर दोन लाखापेक्षा जास्त किमतीचे सोने खरेदी करताना पॅन किंवा आधार कार्ड दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. एवढेच नाही तर दहा लाख रुपये पेक्षा जास्त किमतीचे सोन्याची खरेदी केली तर त्याची माहिती सरकारला देणे आवश्यक आहे.
तसेच दोन लाख रुपयेपेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी करताना तुम्हाला चेक द्वारे पेमेंट करणे किंवा कार्डद्वारे पेमेंट करणे गरजेचे आहे. कारण कॅशमध्ये फक्त तुम्ही दोन लाख रुपयापर्यंतच सोन्याची खरेदी करू शकतात किंवा रोख व्यवहार करू शकतात.