Gold Price : सोन्याची मागणी वाढली ! ग्राहकांच्या मानसिकतेवर काय आहे परिणाम ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सराफा बाजारात सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 160 रुपयांनी वाढ झाली असून, या वाढीनंतर दहा ग्रॅम सोन्याचा भाव 54663 रुपयांवर पोहोचला आहे. या किंमती 22 कॅरेट सोन्याच्या आहेत. 24 कॅरेटबद्दल बोलायचे झाले तर दहा ग्रॅमची किंमत 59,600 रुपयांवर गेली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX बद्दल बोलायचे झाले तर, येथेही सोने 185 रुपयांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. MCX वर दहा ग्रॅम सोन्याचा भाव 59,573 रुपयांवर गेला आहे.

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. MACX वर चांदीच्या दरात 377 रुपयांची वाढ दिसून येत आहे. 377 रुपयांच्या वाढीसह चांदीचा भाव 74, 320 रुपये किलोवर पोहोचला आहे. त्याचबरोबर सराफा बाजारात चांदीच्या दरात 350 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

विक्रमी वाढत्या किमतींमुळे सोन्याची लकाकी…

सोन्याच्या विक्रमी वाढत्या किमतींमुळे सोन्याची लकाकी झोकाळली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी ७ टक्क्यांनी घसरून १५८ टनांवर आल्याची माहिती जागतिक सुवर्ण परिषदेने दिली आहे. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये सोन्याची आयात वार्षिक आधारावर १६ टक्क्यांनी वाढून साठवणुकीमुळे २०९ टन झाली आहे.

जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत २७१ टनांच्या अंदाजानुसार, संपूर्ण वर्षात सोन्याची मागणी ६५० ते ७५० टनांच्या दरम्यान असू शकते, असे म्हटले आहे. आढावा कालावधीत तिमाहीत सोन्याची जागतिक मागणी दोन टक्क्यांनी घसरून ९२१ टन झाली आहे. केंद्रीय बँकांच्या निव्वळ खरेदीमध्ये वार्षिक आधारावर लक्षणीय घट झाल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे.

दुसऱ्या तिमाहीत सोन्याची मागणी मूल्य स्वरूपात ४ टक्क्यांनी वाढून ८२, ५३० कोटी रुपये झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही मागणी ७९,२७० कोटी रुपये होती. सोन्याच्या एकूण मागणीपैकी सोन्याच्या दागिन्यांची मागणी दुसऱ्या तिमाहीत ८ टक्यांनी घटून १२८.६ टन झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १४०.३ टन होती.

ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम

देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे दुसऱ्या तिमाहीत सोन्याच्या मागणीत सात टक्के घट झाली आहे. या वाढलेल्या किमतीचा ग्राहकांच्या मानसिकतेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. सोन्याने काही काळासाठी १० ग्रॅम सोन्याचा भाव ६४,००० रुपयांवर गेल्यामुळे मागणीत घट झाली आहे. देशात कर अनुपालनामुळे मागणीत काहीशी मंदी आल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले.

सोने खरेदी करण्याची योग्य वेळ कधी ? 

जर तुम्हाला गुंतवणुकीसाठी सोने खरेदी करायचे असेल, तर जेव्हा त्याच्या किमती कमी होत असतील तर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो. उदाहरणार्थ, कोविड आणि रशिया-युक्रेन युद्धादरम्यान सोन्याच्या किमतीत वाढ दिसून आली. यानंतर त्याचे भाव घसरायला लागले. यावेळी जर एखाद्याने सोन्यात गुंतवणूक केली असेल तर त्याला आता वाढत्या किमतीचा फायदा मिळू शकेल.

सहा महिन्यात असे बदलले भाव

गेल्या 6 महिन्यांबद्दल बोलायचे झाले तर या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत सोन्यामध्ये 3000 रुपयांची वाढ झाली आहे. रुसो-युक्रेन युद्धामुळे या धातूला आधार मिळाला, त्यामुळे किमतीत वाढ झाली. या दरम्यान सोन्याच्या किमती 6.5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.