Gold Price Today:- गेल्या काही दिवसापासून जर आपण पाहिले तर सोन्याच्या दराने प्रचंड प्रमाणामध्ये उच्चांकी पातळी गाठलेली होती. परंतु देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला व यामध्ये सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्यात आली व त्या दिवसापासून सोन्याच्या दरामध्ये घसरण झालेली होती.
ज्या दिवशी अर्थसंकल्पामध्ये आयात शुल्क कपातीची घोषणा करण्यात आली होती. त्याच्या आधी काही तासानंतर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. त्यानंतर मात्र सोन्या-चांदीच्या दरामध्ये दररोज बदल होताना आपल्याला दिसून येत आहेत.
यामध्ये कधी सोन्याच्या दरामध्ये वाढ पाहायला मिळते तर कधी थोड्याफार प्रमाणात घसरण पाहायला मिळते. जर आपण आजचा सोन्याचा दर पाहिला तर त्यामध्ये देखील बदल झाला असून त्यासोबतच चांदीच्या दरात देखील बदल झाल्याची स्थिती आहे. आज सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
किती आहेत आज सोने आणि चांदीचे दर?
जर आपण सोने चांदीचे आजचे दर पाहिले तर यामध्ये दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 70 हजार 710 असून मागील ट्रेड मध्ये सोन्याची किंमत 69 हजार 940 रुपये प्रति तोळा म्हणजेच दहा ग्रॅम इतकी होती. तसेच बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार बघितले तर चांदीचे दर हे 81480 रुपये प्रतिकिलो असून मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 80 हजार आठशे रुपये प्रतिकिलो इतकी होती.
राज्यातील महत्त्वाच्या चार शहरातील सोन्याचे दर
1- मुंबई– महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहरांमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 64 हजार ६९८ इतकी असून 24 कॅरेट सोन्याची किंमत 70580 प्रति दहा ग्राम इतकी आहे.
2- पुणे शहर– महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्रॅम म्हणजेच प्रतितोळा दर हे 64,698 इतके असून 24 कॅरेट सोन्याचे दर 70580 रुपये प्रति दहा ग्राम आहे.
3- नागपूर– महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर हे 64 हजार 698 रुपये प्रति दहा ग्राम असून 24 कॅरेट सोन्याचे दर हे 70 हजार 580 रुपये प्रति दहा ग्रॅम इतके आहेत.
4- नाशिक शहर– नाशिकमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचे दर बघितले तर ते प्रति दहा ग्रॅम 64 हजार 698 इतके असून 24 कॅरेट सोन्याचे दर 70,580 रुपये प्रति दहा ग्राम इतके आहेत.
काय आहे 22 आणि 24 कॅरेट मधील फरक?
जर आपण 22 आणि 24 कॅरेट सोन्यातील प्रामुख्याने फरक बघितला तर 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते तर 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध सोने असते. 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे तसेच
चांदी व जस्त यासारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. परंतु महत्त्वाचे म्हणजे 24 कॅरेट सोने भरपूर शुद्ध असले तरी त्याच्यापासून दागिने बनवता येत नाहीत. दागिने हे 22 कॅरेट सोन्याचेच बनवले जातात.