आर्थिक

Gold Rate: भाऊ सोने खरेदी करून ठेवणे ठरेल फायद्याचे? या वर्षाच्या शेवटी सोन्याचे भाव जातील 1 लाख रुपये तोळ्यावर? वाचा काय म्हणतात तज्ञ?

Published by
Ajay Patil

Gold Rate:- सोन्या आणि चांदीचे दर जर आपण पाहिले तर कधी नव्हे एवढ्या उच्चांकी पातळीवर असून कमी अधिक प्रमाणात सोन्याच्या भावात चढउतार आपल्याला सध्या दिसून येत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हा सोन्यावरील आयात शुल्कात कपात करण्याची घोषणा त्यांनी केली होती व लागलीच घोषणा झाल्यानंतर दोन ते तीन तासांमध्ये देशात सोन्याच्या किमतींमध्ये घसरण दिसून आली होती.

त्यानंतर मात्र परत सोन्याच्या दरात वाढ होताना आपल्याला दिसली व अजून देखील सोन्याच्या दरात वाढ होतच आहे. देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सोन्याच्या दराने एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 2685.42 वर पोहोचली तर एमसीएक्स वर देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर 75 हजार 750 रुपये प्रति दहा ग्रामच्या पातळीवर पोहोचलेला आहे.ही सगळी आकडेवारी जर बघितली तर या वर्षी सोन्याच्या दरांमध्ये तब्बल 30 टक्क्यांची वाढ झालेली आहे.

 ही कारणे ठरत आहेत सोन्याच्या दरवाढीला कारणीभूत

1- अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने केलेली व्याजदरातील कपात सोन्याचे दर वाढण्यामागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने व्याजदरात केलेली कपात हे प्रमुख कारण सोन्याचे दर वाढीमागे असल्याचे तज्ञांचे मत आहे.

फेडने या महिन्यात व्याजदरात 50 बेसिस पॉईंटचे कपात केली असून त्यानंतर व्याजदर 4.75 ते पाच टक्क्यांवर आले आहेत. यामुळे डॉलर कमकुवत झाला असून याचा फायदा सोन्याला झाला आहे असा अंदाज ग्लोबल ब्रोकरेज फर्म यूबीएसने वर्तवलेला आहे.

2- इस्त्राइल आणि हीजबुल्लाह यांच्यातील वाढता तणाव आपल्याला माहिती आहे की जागतिक पातळीवर देखील अनेक भू-राजकीय तणाव सुरू असून यामध्ये इजराइल आणि हिजबुल्लाह यांच्यातील वाढता तणाव आणि जागतिक अस्थिरता यामुळे देखील गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूककडे आता आकर्षित झाले आहेत. या सगळ्या कारणांमुळे डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचे दर एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात असा देखील अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

3- जगातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची सातत्याने होणारी खरेदी संपूर्ण जगातील ज्या काही मध्यवर्ती बँक आहेत त्यांच्याकडून देखील सातत्याने सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे व हे देखील एक प्रमुख कारण सोने दरवाढीमध्ये असल्याचे तज्ञांचे मत आहे.

तसेच गुंतवणूकदारांचे लक्ष हे सुरक्षित मालमत्तेकडे वळल्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे व याचाच परिणाम दरवाढ होण्यामागे दिसून येत आहे.

 देशात येत्या चार वर्षात दहा ग्राम सोन्याची किंमत जाऊ शकते एक लाख दहा हजार रुपयांवर

कोटक सिक्युरिटी चे अनींदय बॅनर्जी यांच्या मते पुढील चार वर्षात सोन्याची किंमत प्रति औंस चार हजार डॉलर पर्यंत पोहोचू शकते व यामुळे देशांतर्गत बाजारात दहा ग्राम सोन्याची किंमत तब्बल एक लाख दहा हजार रुपयांच्या वर पोहोचण्याची शक्यता आहे.जोपर्यंत अमेरिकेच्या डॉलरमध्ये मोठी वाढ होत नाही किंवा जगातील भूराजकीय तणाव कमी होत नाही तोपर्यंत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होतच राहील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

Ajay Patil