Gold Silver Price Today : सोनं-चांदी खरेदी करण्यासाठी आजचा दिवस खूपच खास, दरांमध्ये मोठी घसरण !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशात तुम्हीही सोने-चांदी खरेदीचा (Gold Silver Price) विचार करत असाल, तर ही बातमी सविस्तर वाचा. आज सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली असून, आज सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी योग्य वेळ आहे. चाल तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर काय आहेत जाणून घेऊया…

आज 3 फेब्रुवारी रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 220 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1000 रुपयांची घसरण झाली आहे.

सराफा बाजाराने शनिवारी जाहीर केलेल्या सोन्या-चांदीच्या नवीन किमतींनुसार, आज 3 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (गोल्ड रेट टुडे) 58,250 रुपये, 24 कॅरेटचा भाव 63,530 रुपये आणि 18 ग्रॅम सोन्याचा दर 47660 वर ट्रेंडिंग आहे. तर 1 किलो चांदीची किंमत 75500 रुपये आहे. नवीन किमतींनंतर सोन्याचा भाव 64000 तर चांदीचा भाव 75000 च्या पुढे गेला आहे.

मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत

आज शनिवारी 22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्ली सराफामध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,110 रुपये मुंबई सराफा बाजारात बाजार 58,250/- तर पुण्यात 58,300 रुपयांवर व्यवहार करत आहे.

24 कॅरेट सोन्याची किंमत

आज शनिवारी 24 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,530/- रुपये आहे. मुंबई सराफा बाजारात 63,380/- तर पुण्यात 63,820 वर व्यवहार करत आहे.

1 किलो चांदीची नवीनतम किंमत

आज शनिवारी, जर आपण मुंबई दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीबद्दल बोललो तर, 01 किलो चांदीची किंमत 75500/- रुपये आहे, तर पुणे बाजारात 76,300 रुपये अशी आहे.