ICICI Bank Golden Years FD : जर तुम्ही जास्त परतावा देणारी एफडी शोधत असाल तुमच्यासाठी ICICI बँकेची गोल्डन इयर्स फिक्स्ड डिपॉझिट योजना उत्तम ठरेल. ICICI बँकेने मे 2020 मध्ये गोल्डन इयर्स फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरू केली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेली ही योजना अतिशय उच्च व्याजदर देते. अशातच या योजनेची लोकप्रियता पाहता ICICI बँकेने गेल्या तीन वर्षांत या मुदत ठेवीची (FD) कालबाह्यता तारीख सतत वाढवली आहे.
अशातच आता तुमच्याकडे या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची ही शेवटची संधी असणार आहे, कारण बँक ही एफडी 30 एप्रिल 2024 रोजी बंद करणार आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, ICICI बँक गोल्डन इयर्स एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
काय आहे योजना ?
-येथील ठेवींचा कालावधी 5 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत असतो. योजनेअंतर्गत केवळ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा करता येते.
-ठेव अकाली पूर्ण किंवा अंशतः बंद केल्यास, 1% दराने दंड भरावा लागेल.
-ICICI बँकेच्या मते, मुदत ठेवींची इतर सर्व वैशिष्ट्ये आणि त्यांच्याशी संबंधित अटी व शर्ती देखील या योजनेला लागू आहेत.
‘या’ योजनेवर मिळणारे व्याजदर
ICICI बँक गोल्डन इयर्स FD अंतर्गत, ज्येष्ठ नागरिकांना किरकोळ मुदत ठेवींवर दिलेल्या विद्यमान अतिरिक्त 0.50 टक्के दराव्यतिरिक्त 0.10 टक्के अतिरिक्त व्याजदर प्रदान केला जातो. या योजनेवर 7.50% व्याज दिले जात आहे.
ज्येष्ठ नागरिक FD दर
ICICI बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.50% ते 7.65% दरम्यान 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी व्याजदर ऑफर करते. 18 महिने ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी सर्वाधिक 7.65% व्याजदर दिला जातो.
इतर बँकांचे विशेष ज्येष्ठ नागरिक एफडी दर
एसबीआय वेकेअर सीनियर सिटीझन डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२३ होती. एचडीएफसी बँक सीनियर सिटीझन केअर एफडीमध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे.