FD Rate Hike : IDFC फर्स्ट बँकेकडून ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! होणार पूर्वीपेक्षा जास्त फायदा

Content Team
Published:
FD Rate Hike

FD Rate Hike : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे, भारतातील एफडी व्याजदर आता खूपच आकर्षक झाले आहेत. मात्र, चलनविषयक धोरण समितीने गेल्या काही बैठकांमध्ये रेपो दर कायम ठेवला आहे त्यात कोणतेही बदल करण्यात आलेला नाही.

तरीही काही बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीचे व्याजदर वाढवत आहेत. आता या यादीत IDFC फर्स्ट बँकेचे नावही जोडले गेले आहे. बँकेने FD वर आता पूर्वीपेक्षा जास्त व्याज देण्याची घोषणाकेली आहे. नवे व्याजदर 21 मार्चपासून लागू झाले आहेत.

व्याजदरात बदल केल्यानंतर, आता IDFC फर्स्ट बँक एफडी करताना सर्वसामान्य नागरिकांना 3.0 टक्के ते 8.0 टक्के वार्षिक व्याज देणार आहे. त्याच वेळी, बँक सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अधिक व्याज देत आहे. अशा स्थितीत बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50 ते 8.50 टक्के वार्षिक व्याज देईल. 500 दिवसांच्या कालावधीसह FD वर जास्तीत जास्त व्याज उपलब्ध आहे. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे.

बँक 7 ते 14 दिवसांच्या FD वर वार्षिक 3 टक्के दराने व्याज देत आहे. तुम्ही 15 ते 29 दिवस आणि 30 ते 45 दिवसांसाठी FD केली तरीही तुम्हाला 3 टक्के व्याज मिळेल. बँक 46 ते 90 दिवस आणि 91 ते 180 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4.50 टक्के दराने व्याज देखील देत आहे. बँक 181 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75 टक्के व्याज देईल.

एका वर्षासाठी FD केल्यास तुम्हाला 6.50 टक्के व्याज मिळेल. एक वर्ष, एक दिवस ते 499 दिवसांच्या एफडीवर 7.50 टक्के व्याज दिले जाईल आणि 500 दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना 8 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 8.50 टक्के व्याज मिळेल.

लक्षात घ्या FD मधून मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे. तुम्ही एका वर्षात FD वर जे काही व्याज कमवाल ते तुमच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाते. FD वर मिळणारे व्याज उत्पन्न “इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न” मानले जाते. जर तुमचे उत्पन्न एका वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर बँक मुदत ठेवींवर टीडीएस कापत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe