PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, दिवाळीनंतर देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठी खूशखबर आली आहे. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून, लवकरच याचा पुढील हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
दरम्यान, 15 नोव्हेंबरला करोडो शेतकऱ्यांना 15व्या हप्त्याची रक्कम मिळू शकते. मात्र तुम्हाला पैसे मिळतील की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे नाव यादीत तपासावे लागणार आहे.
या योजनेतून सरकारने अनेक अपात्र शेतकऱ्यांची नावे यादीतून काढून टाकली आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत, 15 व्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत की नाही हे तुम्ही आधीच तपासले पाहिजे. अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी माहिती दिली.
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी ट्विटरवरील त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की पंतप्रधान श्री @narendramodi जी 15 नोव्हेंबर 2023 रोजी PM किसान सन्मान निधीचा 15 वा हप्ता DBT द्वारे देशातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला जाईल.
दरम्यान, यासाठी यादीमध्ये तुमचे नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंट सक्सेस टॅबखाली भारताचा नकाशा दिसेल. त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या पिवळ्या रंगाचा डॅशबोर्ड दिसेल. तुम्हाला या डॅशबोर्डवर क्लिक करावे लागेल.
दरम्यान, तुम्हाला येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, पंचायत इत्यादी निवडावे लागतील. यानंतर स्टेटस जाणून घेण्यासाठी ‘गेट रिपोर्ट’ वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचा तपशील मिळेल.
देशभरातील शेतकऱ्यांना सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत 14 हप्त्यांचे पैसे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित केले असून, येत्या 15 नोव्हेंबरला शेतकऱ्यांना 15व्या हप्त्याचे पैसेही मिळतील. ही रक्कम दिवाळीनंतर शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिली आहे.
दरम्यान, या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी, लाभार्थी pmkisan-ict@gov.in वर मेल करू शकतात. याशिवाय, तुम्ही हेल्पलाइन क्रमांक 155261, 1800115526 किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.