अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- जिओ आपल्या युझर्स साठी काही ना काही करून स्वस्तात आणि मस्त ऑफर्स बाजारात आणत असते. सध्या नेटवर्किंग मध्ये जिओ कंपनी चा बोलबाला सुरु आहे. लवकरच भारता मध्ये ५ G नेटवर्क आण्याची तयारी त्यांनी केली आहे.
आताच जिओ ने आपल्या युझर्स साठी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. हि ऑफर अगदी कमी पैशामध्ये आहे. जिओ ने केवळ फक्त ७५ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉल आणि डेटा मिळणार अशी ऑफर बाजार यामध्ये आणली आहे.
जिओ चा हा आता पर्यंतचा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. या आधी ३९९ रुपये,४९९ रुपये तर सध्या ५९९ रुपये अश्या प्रकारचे प्लॅन आपल्याला जिओ सिम द्वारे मिळत असायचे. पण आता चा हा प्लॅन हा खूपच स्वस्त आहे.
“ऑल इन वन” या अंतर्गत हा प्लॅन जिओ कडून देण्यात आला आहे. रिलायन्स जिओ ने ४ G नेटवर्क अंतर्गत हा प्लॅन आणला आहे. या प्लॅन ची वैधता तब्बल २८ दिवस एवढी ठेवण्यात आली आहे.
या मध्ये १०० mb डेटा तसेच ५० एसएमस दररोज आपल्याला ऑफर केलेले जाणार आहेत. “ऑल इन वन” मधील सर्वात शेवट १८५ रुपयांवाला प्लॅन आहे.