आर्थिक

Gold Silver Price Today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, बघा आजचे दर

Published by
Ahmednagarlive24 Office

Gold Silver Price Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोन्याचे भाव मंदावले दिसत आहेत. देशांतर्गत बाजारासह COMEX वर सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 0.13 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, आज चांदीच्या दरात वाढ झाली आहे. MCX वर चांदीची किंमत 0.6 टक्क्यांनी वाढली आहे.

देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर नरमले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 83 रुपयांनी घसरला असून तो 62,211 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे. चांदीचा भाव 426 रुपयांनी वाढला असून तो 71,200 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

मोठ्या शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या किंमत

-आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 74,900 रुपये प्रति किलो आहे.

-मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 57,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 74,900 रुपये प्रति किलो आहे.

-पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 57,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,940 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 74,900 रुपये प्रति किलो आहे.

-नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 57,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 74,900 रुपये प्रति किलो आहे.

Ahmednagarlive24 Office