DA Hike Update :- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महागाई भत्ता, घर भाडेभत्ता आणि वेतन आयोग या बाबी खूप महत्वपूर्ण असून कर्मचाऱ्यांच्या थेट जीवनाशी या बाबींचा संबंध येत असल्यामुळे या दृष्टिकोनातून यांना खूप महत्त्व आहे.
सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या काही सेवा सवलती आणि भत्ते मिळत आहेत त्या सगळ्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळत आहे. त्यामध्ये महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात पाहिले तर नुकताच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून
आता 46 टक्के इतका करण्यात आलेला आहे. तसेच आता या नवीन वर्षामध्ये केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांना प्राधान्यस्थानी ठेवत कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाचा फायदा मिळणार असून त्यामुळे त्यांच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे.
या नवीन वर्षात चार टक्क्यांनी महागाई भत्ता वाढण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील अर्थात महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्याचा विचार करत असून एक जानेवारीपासून पुढच्या सहा महिन्यांकरिता हा महागाई भत्ता लागू असेल अशी देखील माहिती समोर आलेली आहे.
या संदर्भातील जी काही अधिकृत घोषणा असेल ती मार्च 2024 मध्ये केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या आपण एआयसीपीआय इंडेक्स पाहिला तर त्याची आकडेवारी सध्या 139.1 टक्क्यांवर पोहोचल्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यासोबतच त्यांच्या पगारात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के महागाई भत्ता मिळत आहे व सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर जर यामध्ये परत चार टक्क्यांची वाढ झाली तर तो 50 टक्क्यांवर पोहोचणार आहे. जर महागाई भत्ता 50 टक्क्यांवर गेला तर त्याचा सकारात्मक परिणाम हा कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. महागाई भत्ता वाढ जाहीर झाल्यास त्याचा फायदा देशातील 48.67 केंद्र सरकारी कर्मचारी व 67.95 लाख निवृत्ती वेतनधारक यांना होणार आहे.
पगारात कशी होईल वाढ?
समजा एखाद्या व्यक्तीला मासिक पगार 50 हजार रुपये असेल व त्याचे मूळ वेतन 15 हजार रुपये आहे तर सध्याच्या महागाई भत्ता दरानुसार त्या व्यक्तीला 42 टक्के म्हणजेच पाच हजार तीनशे रुपये मिळतात. त्यामध्ये जर चार टक्के रक्कम वाढली तर
यामध्ये सहा हजार नऊशे रुपये पर्यंत वाढ होईल. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला 50 हजार रुपये महिन्याला पगार असेल आणि त्याचे मूळ वेतन 15 हजार रुपये असेल तर त्याचा पगार महिन्याला सहाशे रुपयांनी वाढू शकतो.