FD Interest Rates : एचडीएफडी बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, वाचा…

Content Team
Published:
FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्हाला तुमचे पैसे कुठेतरी गुंतवायचे असतील तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आज आम्ही अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला योग्य परतावा देखील मिळेल. आम्ही एचडीएफसी बँकेबद्दल बोलत आहोत. या बँकेत एफडी करून तुम्ही बक्कळ परतावा कमावू शकता.

नुकतेच एचडीएफसी बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना एफडीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळू शकेल. एचडीएफसी बँकेकडून किती दिवसांच्या मुदत ठेवींवर किती व्याजदर दिला जात आहे ते पुढीलप्रमाणे :-

एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर जास्त व्याजदराचा लाभ मिळेल. बँक एफडीवर 7.75 टक्के व्याजदराचा लाभ ग्राहकांना देत आहे. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसह FD सुविधा प्रदान करते.

HDFC बँकेच्या ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर जास्त व्याजदराचा लाभ मिळत आहे. बँकेने एफडी दरात 0.25 टक्क्यांनी वाढ केली आहे. बँकेने त्यांच्या अधिकृत साइटवर व्याजदर वाढवण्याबाबत माहिती शेअर केली आहे.

ग्राहकांना 8 महिन्यांपासून ते 20 महिन्यांपर्यंतच्या कालावधीवर सर्वाधिक व्याजदराचा लाभ मिळेल. सामान्य गुंतवणूकदारांना एफडीवर 7.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ दिला जाईल.

त्याच वेळी, जर एखाद्याने 5 वर्षे, 1 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीची FD केली तर त्याला 7.75 टक्के व्याजाचा लाभ देखील मिळेल. मात्र, या टक्केवारीच्या व्याजदराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. तर, सामान्य गुंतवणूकदारांना 7 टक्क्यांपर्यंत व्याजाचा लाभ मिळतो आहे.

7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD वर 3.5 टक्के ते 7.75 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. 18 महिने ते 21 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD ला 7 ते 7.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe