आर्थिक

Jio ग्राहकांसाठी गुड न्यूज ! कंपनीचा नवीन प्लॅन लाँच, 895 रुपयाचा रिचार्ज करा, मिळणार 336 दिवसांची व्हॅलेडीटी, वाचा डिटेल्स

Published by
Ahmednagarlive24 Office

Jio Recharge Plan : रिलायन्स समूहाच्या रिलायन्स जिओ या टेलिकॉम कंपनीच्या ग्राहकांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये रिलायन्स जिओ संपूर्ण भारतात पसरले आहे. गावागावांमध्ये जिओची लोकप्रियता वाढत चालली आहे. जिओने सुरुवातीला काही काळ मोफत रिचार्ज उपलब्ध करून एक मोठा ग्राहक वर्ग तयार करून घेतला आहे.

विशेष म्हणजे जिओचे नेटवर्क आणि प्लॅन देखील सर्वसामान्यांसाठी फारच फायदेशीर ठरत आहेत. यामुळे जिओ ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आजच्या घडीला रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपनी बनली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रिलायन्स जिओ ही देशातील दिग्गज टेलिकॉम कंपन्यांपैकी एक आहे. रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन निर्णय घेत असते.

अशातच आता नवीन वर्ष सुरू होण्याच्या पूर्वीच रिलायन्स जिओनी आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. Jio ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. हा प्लॅन फक्त 895 रुपयांचा असून यां प्लॅनची Validity 336 दिवसांची राहणार आहे. हा प्लॅन नुकताच लॉन्च झाला असून आता आपण या प्लॅन बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जर तुम्हालाही कमी पैसे खर्च करून जास्तीची व्हॅलिडिटी असलेला रिचार्ज प्लान हवा असेल तर रिलायन्स जिओचा हा 900 रुपयांपेक्षा कमीचा हा प्लॅन तुमच्यासाठी खूप चांगला ठरू शकतो. Jio 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 336 दिवसांची वैधता ऑफर करते. म्हणजे जवळपास एका वर्षाचा हा प्लॅन असेल. यामुळे एकदा रिचार्ज केले की एक वर्ष तुम्हाला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही.

जर तुमचा इंटरनेटचा वापर कमी असेल तर हा प्लॅन तुमच्यासाठी सर्वात बेस्ट ठरू शकतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉल्सचा म्हणजे तुम्ही हा रिचार्ज केला तर तुम्हाला अनलिमिटेड कॉल करता येणार आहेत. या प्लॅनमध्ये 2GB हायस्पीड इंटरनेट डेटाही 28 दिवसांसाठी उपलब्ध असतो.

म्हणजेच 28 दिवसांसाठी 2 जीबी याप्रमाणे या संपूर्ण प्लॅनमध्ये तुम्हाला 12 वेळा 2-2GB हाय स्पीड डेटा मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला या प्लानमध्ये 28 दिवसांसाठी 50 एसएमएस देखील मिळणार आहेत. म्हणजेच प्रत्येक 28 दिवसांसाठी तुम्हाला 50 एसएमएस मिळणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Jio Users