अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- सध्या कोरोनामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या काळामध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या काळात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी भारतीय हवाई दलाने मोठी सुवर्णसंधी आणली आहे.
आपल्या अधिकृत afcat.cdac.in या वेबसाईटवरुन फ्लाईंग ब्रँच आणि ग्राऊंड ड्युटीकरीता कॉमन ॲडमिशन टेस्टसाठी (AFCAT) अधिसूचना जारी केली आहे. आयएएफ एएफसीएटी 2021 साठीची नोंदणी प्रक्रिया 1 डिसेंबरपासून सुरू झाली असून, या करिता अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2020 पर्यंत आहे.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. आयएएफच्या फ्लाईंग ब्रँच आणि पर्मनंट कमिशन (पीसी) शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) आणि ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) मधील शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) या अभ्यासक्रमांच्या जानेवारी 2022 मधील प्रवेशासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत.
ऑनलाईन अर्ज असा भरा