अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :-सरकारी बँक Bank Of Baroda ने स्वतःचे डिजिटल लेन्डिंग प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. याद्वारे आपण आपल्या वेळ आणि स्थानानुसार काही मिनिटांत ऑनलाइन प्रक्रियेद्वारे कर्ज मिळवू शकता.
दरम्यान या योजनेबाबत बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक विक्रमादित्य सिंह खिनी म्हणाले की, गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जासाठी ग्राहकांना होणार्या अडचणी लक्षात घेता बँक ऑफ बडोदाने ही सुविधा सुरू केली आहे. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि ग्राहकांचे वैयक्तिक कर्ज अर्ज 30 मिनिटांत मंजूर केले जातील.
फिक्स्ड डिपॉझिट (FD) च्या आधारे त्वरित उपलब्ध होणार कर्ज :- मुदत ठेवींवर (एफडी), बँक कर्जदेखील देत आहे, अर्थात ज्या ग्राहकांचे बँकेत एफडी आहे ते मोबाइल बँकिंग किंवा नेट बँकिंगद्वारे त्वरित कर्ज घेऊ शकतात. 30 मिनिटात लोन मंजूर- बँक ऑफ बडोदाच्या नवीन डिजिटल लेन्डिंग प्लँटफॉर्मच्या माध्यमातून अर्ध्या तासात गृह कर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज मंजूर केले जाईल. कर्ज अर्जदाराच्या आर्थिक प्रोफाइलच्या विविध स्त्रोतांद्वारे डिजिटल कर्ज प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. बीओबीच्या या नवीन फीचरचा लाभ वेबसाइट, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून मिळू शकेल.
किरकोळ खरेदीवरही करू शकतो EMI :- जर आपण बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल, तर आपण किरकोळ खरेदीसाठीही प्री- अॅप्रूव्ड माइक्रो पर्सनल लोन घेऊ शकता. हे कर्ज अवघ्या 60 सेकंदात बँक ऑफ बडोदाच्या अॅप एम-कनेक्टद्वारे मंजूर होईल. तसेच ही रक्कम परत करण्यासाठी बँक ऑफ बडोदा 3 ते 18 महिन्यांचा ईएमआय पर्याय देखील देईल.