अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- जर आपण देखील Google पेद्वारे पेमेंट करत असाल तर सावधगिरी बाळगा. गुगल पे वर लोकांचा पर्सनल डाटा स्टोर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात 14 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
अभिजीत मिश्रा यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार गुगल पे पेमेंट ऑनलाइन पेमेंट सिस्टमचे उल्लंघन करीत आहे. दाखल केलेल्या याचिकेनुसार गुगल पे पेमेंट करताना ग्राहकांकडून वैयक्तिक माहिती घेत आहे.
आरोपानुसार, कंपनी पेमेंट कारतेवेळेस लोकांचे आधार आणि बँकेसंदर्भात माहिती घेत असून स्टोअर करत आहे. वास्तविक ते गोपनीयतेच्या अधिकाराच्या नियमांचे उल्लंघन आहे. गोपनीयता अधिकाराचे उल्लंघन करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि गुन्हा असल्याचे सिद्ध झाल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे.
कंपनी नियमांचे पालन करीत नाही :- अभिजीत मिश्रा यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की कंपनी आधार कायदा 2016, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्ट 2007 आणि बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 चे उल्लंघन करीत आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे.
जर हे प्रकरण सिद्ध झाले तर कंपनीवर कारवाई होऊ शकते. या याचिकेवर 14 जानेवारी रोजी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती प्रतीक जलान आणि विभू बाखरु यांच्या खंडपीठात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. खंडपीठाने याचिकाकर्त्यास सर्व माहिती पुरविण्यास सांगितले आहे.
गुगल पेसह अशा प्रकरणांमध्ये सर्व जनहित याचिका द्याव्यात असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. या प्रकरणात, गूगल ही तिसरी मोठी परदेशी कंपनी बनली आहे ज्याविरूद्ध नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकरण भारतात समोर आले आहे. यापूर्वी परवा ईडीने Amazon आणि फ्लिपकार्टवर कारवाईचे आदेश दिले आहेत.