अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-देशाची आर्थिक परिस्थिती वर्षभर दडपणाखाली राहिली . बँक आणि पोस्ट ऑफिसमधील व्याजदर कमी होत गेले. मात्र यात सन 2020 च्या वर्षात शेअर बाजारात जवळपास 200 शेअर्स होते ज्याने लोकांच्या गुंतवणूकीवर दुप्पट रिटर्न दिले आहे.
यापैकी काही शेअर्सनी गुंतवणूकीवर 1000 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. काही शेअर्सनी अमाप नफा कमावून दिला. जाणून घेऊयात त्यांविषयी –
बायोफिल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स बायोफिल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सने 2020 मध्ये गुंतवणूकदारांची झोळी भरली आहे. 2020 मध्ये या शेअर्समध्ये सुमारे 1200 टक्के परतावा देण्यात आला आहे.
मागील वर्षी म्हणजेच 31 डिसेंबर 2019 रोजी हा शेअर 17.06 रुपयांवर होता. त्याच वेळी 23 डिसेंबर 2020 रोजी या शेअरचा दर वाढून 222.95 रुपये झाला. मागील वर्षी 31 डिसेंबरला एखाद्याने या स्टॉकमध्ये केवळ 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर आज त्याचे मूल्य जवळपास 13 लाख रुपये झाले असेल.
अनेक पटीने पैसे वाढवणारे शेअर्स
सेंसेक्सचे टॉप 5 गेनर शेअर