Top 5 Mutual Fund : भारीचं ना ! तीन वर्षात पैसे दुप्पट करणारी स्कीम, तुम्ही कधी करताय गुंतवणूक?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 5 Mutual Fund : देशात सुमारे 40 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. अशा परिस्थितीत, आपल्यासाठी योग्य पर्याय निवडणे खूप कठीण होऊन बसते. सर्व कंपन्यांच्या सर्व योजनांचे परतावे एकाच वेळी जाणून घेणे खूप कठीण आहे. म्हणूनच आज आम्ही टॉप म्युच्युअल फंडाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जेणेकरून तुम्हाला गुंतवणूक करणे सोपे होईल.

आज आम्ही तुम्हाला क्वांट म्युच्युअल फंडाच्या टॉप 5 म्युच्युअल फंड योजनांबद्दल सांगणार आहोत. या म्युच्युअल फंड योजनांनी अवघ्या 3 वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटीने वाढवले ​​आहेत. जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हे पर्याय तुमच्यासाठी योग्य आहेत.

जर तुमचेही, मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण अशी दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे असतील, तर ती SIP च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून सहज पूर्ण करता येतात. ही आर्थिक उद्दिष्टे प्रदीर्घ काळासाठी असतात, त्यामुळे दर महिन्याला थोडे पैसे जमा करून ते सहज साध्य करता येतात.

टॉप 5 म्युच्युअल फंड योजना :-

-क्वांट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड योजना सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही म्युच्युअल फंड योजना गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी सरासरी 46.89% परतावा देत आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड योजनेत 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य आता सुमारे 3.97 लाख रुपये झाले असेल.

-दुसऱ्या म्युच्युअल फंड योजनेबद्दल बोलायचे झाल्यास, क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर म्युच्युअल फंड योजना देखील सातत्याने चांगला परतावा देत आहेत. ही म्युच्युअल फंड योजना गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी सरासरी 42.03% परतावा देत आहे. या म्युच्युअल फंड योजनेत कोणी 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य आता सुमारे 3.45 लाख रुपये असेल. म्हणजेच या योजनेने एकूण तीन पट परतावा आपल्या गुंतवणूकदारांना दिला आहे.

-क्वांट मिड कॅप म्युच्युअल फंड योजना देखील सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही म्युच्युअल फंड योजना गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी सरासरी 37.49% परतावा देत आहे. जर एखाद्याने 3 वर्षांपूर्वी या म्युच्युअल फंड योजनेत 1 लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याचे मूल्य आता सुमारे 3.03 लाख रुपये असेल.

-क्वांट फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड योजना देखील सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही म्युच्युअल फंड योजना गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी सरासरी 33.61% परतावा देत आहे. जर तुम्ही या योजनेत 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे मूल्य आता सुमारे 2.70 लाख रुपये असते.

-क्वांट अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना देखील सातत्याने चांगला परतावा देत आहे. ही म्युच्युअल फंड योजना गेल्या तीन वर्षांपासून दरवर्षी सरासरी 31.97% परतावा देत आहे. जर तुम्ही यात 3 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर त्याचे मूल्य आता सुमारे 2.58 लाख रुपये असते.